+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust शाहू छत्रपतींनी मानले आभार, जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित ! adjustमतदान केंद्रावर हाणामारी, महायुती-महाविकासचे कार्यकर्ते भिडले adjustचुरशीने मतदान, जिल्हयात अकरा वाजेपर्यंत 23 टक्के मतदान adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार
Screenshot_20240226_195247~2
schedule09 Nov 22 person by visibility 1629 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : सेवानिवृत्तीचा कालावधी म्हणजे आरामदायी जगणं. निवांतपणे जगण्याचा आनंद लुटणं, पर्यटन करणं. मात्र काही मंडळी याला अपवाद असतात. नवनवीन शिकण्याची आस त्यांना स्वस्थ बसू देत नाही. वेगळे काही तरी करण्यात त्यांचा आनंद, समाधान सामावलेला असतो. ६६ वर्षीय विद्याधर केशव बोलाईकर यांची गोष्ट ही वेगळी. बोलाईकर हे रिझर्व्ह बँकेतील सेवानिवृत्त मॅनेजर. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी कायद्याची पदवी प्राप्त केली आहे. ते एलएलबी झाले आहेत.
 मुळात बोलाईकर हे मूळचे करवीर तालुक्यातील हळदी येथील. प्रसिद्ध डॉ. कै. केशव रामचंद्र बोलाईकर यांचे ते ज्येष्ठ पुत्र. विद्याधर बोलाईकर यांचे प्राथमिक शिक्षण ग्रामीण भागात झाले. १९८१ मध्ये त्यांनी स्पर्धा परीक्षा देत रिझर्व्ह बँकेत नोकरीला लागले. जवळपास ३७ वर्षे नोकरी केली. प्रदीर्घ सेवेनंतर ते मॅनेजर या पदावरुन सेवानिवृत्त झाले.
 सेवानिवृत्त झाल्यानंतर कायद्याची पदवी घेण्याचे ठरविले. रितसर प्रवेश परीक्षा दिली. २०१७ मध्ये कोल्हापुरातील शहाजी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पाच वर्षात एलएलबी झाले. कायद्याची पदवी घेतल्यानंतर बोलताना विद्याधर बोलाईकर म्हणाले, “शिक्षणासाठी वयाचे बंधन नसते. मनात जिद्द हवी. बँकेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर कायद्याचा अभ्यासक्रम शिकायचा मी निर्णय घेतला. शहाजी लॉ कॉलेजमध्ये एलएलबी अभ्यासक्रमासाठी रितसर प्रवेश घेतला. कायद्याच्या शिक्षणाचा उपयोग गरीब, गरजू लोकांसाठी करणार आहे. वकिलीच्या माध्यमातून अडचणीत सापडलेल्या लोकांना मदत करण्याचा मानस आहे. मुंबईत वकिली करणार आहे. ”