+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान adjustसज्जनशक्ती परिषदेत अजित ठाणेकरांच्या उमेदवारीचा जागर
1001130166
1000995296
schedule29 Jun 24 person by visibility 171 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर कोल्हापूर :   कोल्हापूर शहर परिसरातील रस्ते दुरुस्तीसह विविध समस्या मार्गी लावा अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केल्या. आमदार ऋतुराज पाटील यांनी काँग्रेसच्या माजी नगरसेवकासहित शहरातील घटना संदर्भात महापालिका प्रशासक के मश यांच्याशी चर्चा केली त्यांना निवेदने दिले.
 थेट पाइपलाइनद्वारे सुरळीत पाणी पुरवठा, शहर आणि उपनगरातील रस्त्यांची दुरुस्ती व नालेसफाई करा, पाणी पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करा, रंकाळा प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी करावी अशा सूचना आमदार पाटील यांनी प्रशासकांना केली. 
कोल्हापूर शहर आणि उपनगर भागातील विविध मूलभूत समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी आमदार पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक के . मंजूलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे आणि शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत व अन्य अधिकाऱ्यासोबत ताराबाई पार्क येथील निवडणूक कार्यालयात बैठक घेतलीं.
 टेंबलाईवाडी येथील महानगरपालिकेच्या १२ हजार चौरस फूट जागेमध्ये क्रीडांगण विकसित करावे, रंकाळा प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी करावी अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी केल्या. याबाबतचा प्रस्ताव शासनाकड पाठवला जाईल असे प्रशासकांनी सांगितले. कसबा बावडा येथील झूम प्रकल्पाच्या प्रदूषणामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत . शहरातील कचऱ्याचा उठाव वेळेवर होत नाही. यावर कायमस्वरूपी उपाय शोधणे गरजेचे आहे ,असे त्यांनी सांगितले.
 यावेळी माजी स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख, दुर्वास कदम, मधुकर रामाणे, दिग्विजय मगदूम, सुयोग मगदूम आणि प्रवीण केसरकर यांनीही शहरातील समस्या मांडल्या.