प्रख्यात वास्तूशिल्पकार दिलीप भिर्डी यांचे निधन
schedule15 Feb 26 person by visibility 25 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रख्यात वास्तुशिल्पकार (आर्किटेक्ट) आणि सामाजिक कार्यात अग्रेसर व्यक्तिमत्व दिलीप श्रीमंधर भिर्डी यांचे शुक्रवारी, १३ फेब्रुवारी रोजी वृद्धापकाळामुळे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. दिलीप भिर्डी यांनी आपल्या अद्वितीय कल्पकतेने आणि सामाजिक बांधिलकीने वास्तुकलेला एक नवे परिमाण दिले. त्यांनी पुणे, कोल्हापूरसहित अनेक ठिकाणी उभारलेल्या वास्तू , वास्तुकलेचा उत्तम नमुना असून पर्यावरणपूरक विचारांचा संदेश देणाऱ्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांपासून ते प्रसिद्ध व्यक्तीपर्यंत सर्व स्तरातील लोकांसाठी त्यांनी दीर्घकाळापासून वास्तुनिर्मिती केली. पर्यावरण संवर्धन आणि पक्षी प्राणी यांच्या संरक्षणासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले.सोसायटी फॉर ऍनिमल प्रोटेक्शन (सॅप) संस्थेच्या कोल्हापूर विभागाचे अध्यक्षपदी कार्यरत असताना त्यानी प्रभावीपणे कार्य केले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे.