Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये पत्रकारांचा सत्कारअकरा किलोचा भोपळा ! दहा किलोचा कोहळा सुरण, एक किलोचे वांगे! !प्रख्यात वास्तूशिल्पकार दिलीप भिर्डी  यांचे निधनघघ थथशिक्षक बँकेत महिलाराज ! अध्यक्षपदी वर्षा केनवडे, उपाध्यक्षपदी पद्मजा मेढे संघर्षाची तयारी ठेवली की यश स्वतःहून दार ठोठावते - डॉ . महादेव नरकेभीमा कृषी प्रदर्शनास दिमाखात प्रारंभ, शेतीविषयक माहिती एका छताखाली दाजीशी, माझं भांडण नाही, वांदे तर मंत्री मुश्रीफ- एवाय यांच्यामध्ये - के. पी. पाटीलजिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सुधीर देसाई एमपीएससी एग्रीकल्चरलमध्ये पल्लवी पाटील राज्यात आठवी

जाहिरात

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये पत्रकारांचा सत्कार

schedule15 Feb 26 person by visibility 14 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी ज्या पहिल्या पाच शाळा  कॉलेज सुरु केल्या त्यापैकी एक म्हणजे कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल या प्रशालेने विद्यार्थीकेंद्रित उपक्रम राबवित वेगळेपण जपले आहे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेसह क्रीडा आणि अन्य स्पर्धेतही छाप उमटविली आहे. हायस्कूलतर्फे समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत मान्यवरांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी, त्यांचे कार्य समजावे यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्या अनुषंगाने हायस्कूलमध्ये नुकताच पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक व कोल्हापूर विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे यांनी प्रास्ताविक करताना हायस्कूलच्या वर्षभराच्या शैक्षणिक कामगिरीचा आढावा घेतला. विविध परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश, समाजातील विविध घटकांची शाळेला मदत याविषयी ऊहापोह केले.विवेकानंद शिक्षण संस्था व हायस्कूलच्या विविध शैक्षणिक उपक्रमांना लोकांपर्यत पोहोचविणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात येत असल्याचे सांगितले. याप्रसंगी महाराष्ट्र न्यूज वनचे पत्रकार आप्पासाहेब माळी, पत्रकार सतीश घाटगे, पत्रकार कृष्णात पुरेकर, यशवंत लांडगे, पत्रकार अनिल चव्हाण, बावसेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक ए .के. कांबळे यांनी सूत्रसंचालक नेले. प्रशालेचे मुख्याध्यापक बी. जे. सावंत यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes