Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
एमपीएससी एग्रीकल्चरलमध्ये पल्लवी पाटील राज्यात आठवीपाच फुटी सरडा, चौदाशे किलोचा रेडा, बारा लाखाची खिल्लार कामगार- कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक,  सरकारच्या चार श्रमसंहितेला जोरदार विरोधकोल्हापुरात आयुष विद्यापीठ स्थापण्यासाठी प्रयत्नशील-सहपालकमंत्री माधुरी मिसाळविट्यात २२ फेब्रुवारीला ४४ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनकास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची प्रशासनासोबत चर्चाशिवाजी विद्यापीठात शनिवारी आंतरराष्ट्रीय परिषदशाहू महाराज हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहातसांगलीत सोळा फेब्रुवारीपासून राज्य कला प्रदर्शन, १२७५ कलाकृतींचे प्रदर्शनकोल्हापुरात रंगणार पुजाऱ्यांची क्रिकेट स्पर्धा, विविध जिल्ह्यातील बारा संघांचा सहभाग

जाहिरात

 

एमपीएससी एग्रीकल्चरलमध्ये पल्लवी पाटील राज्यात आठवी

schedule13 Feb 26 person by visibility 17 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  जिद्द, चिकाटी, सातत्यपूर्ण अभ्यास आणि इच्छाशक्तीच्या जोरावर कोल्हापूर येथील नागोजीराव पाटणकर हायस्कूलचे निवृत्त शिक्षक एस. ए. पाटील यांची कन्या पल्लवी पाटील हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी राज्यसेवा परीक्षेत राज्यात आठवा क्रमांक पटकावला. या यशामुळे तिची राज्य शासनाच्या कृषी उपसंचालक या पदावर नुकतीच निवड झाली आहे आणि विशेष म्हणजे तिने हे यश पहिल्याच प्रयत्नामध्ये पूर्ण केला आहे 
तिचे प्राथमिक शिक्षण राजर्षी छत्रपती शाहू विद्यालय न्यू पॅलेस येथे झाले. तसेच इयत्ता अकरावी बारावी विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथे झाले असून बीएससी एग्रीकल्चर कॉलेज हे शिक्षण डी वाय पाटील कॉलेज तळसंदे येथे पूर्ण झाले आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षण एग्रीकल्चर एम एस सी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे पूर्ण केले.  तिने या परीक्षेमध्ये यश मिळवून ऍग्रीकल्चर क्लास वन अधिकारी होण्याचा मान मिळविला आहे. यशामध्ये कुटुंबातील आई-वडील भाऊ तसेच सर्व शिक्षक व मित्रपरिवार यांचा मोठा वाटा आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes