Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षक बँकेत महिलाराज ! अध्यक्षपदी वर्षा केनवडे, उपाध्यक्षपदी पद्मजा मेढे संघर्षाची तयारी ठेवली की यश स्वतःहून दार ठोठावते - डॉ . महादेव नरकेभीमा कृषी प्रदर्शनास दिमाखात प्रारंभ, शेतीविषयक माहिती एका छताखाली दाजीशी, माझं भांडण नाही, वांदे तर मंत्री मुश्रीफ- एवाय यांच्यामध्ये - के. पी. पाटीलजिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सुधीर देसाई एमपीएससी एग्रीकल्चरलमध्ये पल्लवी पाटील राज्यात आठवीपाच फुटी सरडा, चौदाशे किलोचा रेडा, बारा लाखाची खिल्लार कामगार- कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक,  सरकारच्या चार श्रमसंहितेला जोरदार विरोधकोल्हापुरात आयुष विद्यापीठ स्थापण्यासाठी प्रयत्नशील-सहपालकमंत्री माधुरी मिसाळविट्यात २२ फेब्रुवारीला ४४ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

जाहिरात

 

शिक्षक बँकेत महिलाराज ! अध्यक्षपदी वर्षा केनवडे, उपाध्यक्षपदी पद्मजा मेढे

schedule14 Feb 26 person by visibility 71 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची प्रमुख आर्थिक संस्था असलेल्या   दि प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी वर्षा शरद केनवडे तर उपाध्यक्षपदी पद्मजा तानाजी मेढे यांची निवड झाली. शिक्षक बँकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अध्यक्ष  व उपाध्यक्षपदी महिला संचालकांची निवड झाली आहे. बँकेच्या संचालक मंडळांची शनिवारी 14 फेब्रुवारी रोजी बैठक झाली सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक युसुफ शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. दरम्यान उपाध्यक्षपदी पद्मजा मेढे यांची तिसऱ्यांदा निवड झाली आहे.

या सभेमध्ये अध्यक्षापदासाठी केनवडे यांचे नाव संचालक  नंदकुमार तुकाराम वाईंगडे यांनी सुचविले. संचालक गजानन सखाराम कांबळे यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षापदीसाठी  मेढे यांचे नाव संचालक अर्जुन दिनकर पाटील यांनी सुचविले. त्यास  संचालक रामदास शामराव झेंडे यांनी अनुमोदन दिले.नूतन अध्यक्षा वर्षा शरद केनवडे यांनी बँकेचे संचालक व सुकाणू समितीचे सर्व पदाधिकारी यांचे आभार मानले. या संधीचा मी बँकच्या प्रगतीसाठी व सभासदांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करीन. अध्यक्षपदाच्या कालावधीमध्ये बँकेचा कारभार पारदर्शी होण्यासाठी आणि बँकेचा व्यवसाय व ठेवींमध्ये वाढ होण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. वचननाम्याच्या पूर्ततेसाठी सकारात्मक उर्जा घेऊन सभासदांच्या आर्थिक उन्नतीचा विचार घेऊनच संचालक मंडळ काम करील. सभासदांच्या अडचणी समजावून घेवून त्या सोडविण्यासाठी आपला प्रयत्न राहील.

 सभेस संचालक  बाळकृष्ण हळदकर, बाळासाहेब निंबाळकर, राजेंद्रकुमार पाटील, सुनिल एडके, शिवाजी रोडे-पाटील, सुरेश कोळी, एस.व्ही. पाटील,  अमर वरुटे, शिवाजी बोलके  गौतम वर्धन तसेच सुकाणू समितीचे  जोतीराम पाटील, रविकुमार पाटील, सुनिल पाटील, विलास चौगुले, प्रमोद तौंदकर, रघुनाथ खोत, संजय कुईकर, राज्यनेते उद्यजी शिंदे, महासचिव राजन कोरगांवकर, उपाध्यक्ष राजन सावंत, दादा जांभवडेकर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  संजयकुमार मगदूम उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes