Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूलमध्ये पत्रकारांचा सत्कारअकरा किलोचा भोपळा ! दहा किलोचा कोहळा सुरण, एक किलोचे वांगे! !प्रख्यात वास्तूशिल्पकार दिलीप भिर्डी  यांचे निधनघघ थथशिक्षक बँकेत महिलाराज ! अध्यक्षपदी वर्षा केनवडे, उपाध्यक्षपदी पद्मजा मेढे संघर्षाची तयारी ठेवली की यश स्वतःहून दार ठोठावते - डॉ . महादेव नरकेभीमा कृषी प्रदर्शनास दिमाखात प्रारंभ, शेतीविषयक माहिती एका छताखाली दाजीशी, माझं भांडण नाही, वांदे तर मंत्री मुश्रीफ- एवाय यांच्यामध्ये - के. पी. पाटीलजिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सुधीर देसाई एमपीएससी एग्रीकल्चरलमध्ये पल्लवी पाटील राज्यात आठवी

जाहिरात

 

अकरा किलोचा भोपळा ! दहा किलोचा कोहळा सुरण, एक किलोचे वांगे! !

schedule15 Feb 26 person by visibility 9 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शेती क्षेत्रांशी निगडीत विविध स्टॉल, विविध जातीचे पशुपक्षीसोबतच भीमा कृषी प्रदर्शनमध्ये आकर्षण ठरत आहेत ते शेतपीके. एक फुटाचे रताळ, सुळकुड येथील अकरा किलोचा भोपळा, तीन फूट दुधी भोपळा येथील पेरले येथील आदर्श चौगुले यांचा दहा किलो वजनाचा देशी कोहळा,२५ किलोचा वाकरे येथील देशी केळी घड आकर्षण शिरोळ येथील १५ किलो वजनाची हळद गठ्ठा हे शहरवासियांसाठी आकर्षण ठरत आहे. येथील मेरी वेदर मैदान येथे हे प्रदर्शन सुरू आहे.

शेतकऱ्यांना एकाच छताखाली नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी या उद्देशाने  आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी उपयुक्त असलेली माहिती मिळणारे व शेतीसाठी आवश्यक असणारे साहित्य एकाच छताखाली खरेदी करता याव्यात यासाठी कृषी व पशूप्रदर्शनाचे आयोजन केले आहे. प्रदर्शनात दोनशे हून अधिक महिला बचत गटाचे स्टॉल, २५० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचा सहभाग,अन्य पशुपक्षी विविध, शेतीला लागणारी विविध अवजारे, बी बियाणे, खते, आयुर्वेदिक औषधे यांचा समावेश आहे. प्रदर्शनात तांदळाची विक्री मोठया प्रमाणात झाली. प्रदर्शनात धान्य मध्ये नाचणी,इंद्रायणी भात,दौलत जातीची नाचणी, काळा जिरगा,सुवासिक ब्लॅक राईस, काळा वाटाणा,भुईमुग शेंग

प्रदर्शनात  शेतकऱ्यानी पिकविलेला विविध प्रकारचा तांदूळ, ११ किलोचा भोपळा १० किलोचा कोहळा सुरण, भीमा कृषी प्रदर्शनात १ किलोचे वांगे एक फुटाचे रताळ, सुळकुड येथील अकरा किलोचा भोपळा, तीन फूट दुधी भोपळा येथील पेरले येथील आदर्श चौगुले यांचा दहा किलो वजनाचा देशी कोहळा २५ किलोचा वाकरे येथील देशी केळी घड पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत. भागीरथी महिला संस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना मोफत झुणका भाकरीचे वाटप करण्यात आले. प्रदर्शनस्थळी खासदार धनंजय महाडिक,युथ आयकॉन कृष्णराज महाडिक,सी चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक,भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक,भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्ष अरुंधती महाडिक यांनी भेट दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes