जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सुधीर देसाई
schedule13 Feb 26 person by visibility 217 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तब्बल वीस जागा जिंकत महायुतीमध्ये मोठा भाऊ ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रमुख नेतेमंडळींची शुक्रवारी कोल्हापुरात बैठक झाली. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी सुधीर देसाई यांची निवड करण्यात आली. सुधीर देसाई हे आजरा तालुक्यातील पेरणोली मतदार संघातून निवडून आले आहेत. तसेच ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत.