संघर्षाची तयारी ठेवली की यश स्वतःहून दार ठोठावते - डॉ . महादेव नरके
schedule14 Feb 26 person by visibility 26 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : संघर्ष आयुष्यात असत नाही तोपर्यंत यशाला किंमत नसते.संघर्षाला चिकटलेले यश आयुष्यभर आनंद घेत राहते . त्यामुळं येणारी पिढी मोठ्या कष्ठानं घडवण्याचं काम शिक्षकांनी करत राहवे 'असे आवाहन प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी केलं. ते कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित बक्षीस वितरण सोहळ्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पतसंस्थेचे संस्थापक शिक्षक नेते भरत रसाळे हे होते .तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासन अधिकारी डी .सी . कुंभार व गटशिक्षणाधिकारी जे . टी . पाटील हे होते .यावेळी पाहुण्यांच्या हस्ते आदर्श शिक्षक, सेवानिवृत्त सभासद आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या ३३ व्या वर्धापनदिनाच्या निमित्तानं या विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते* *कार्यकमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्राचार्य डॉ. महादेव नरके म्हणाले की. संघर्षाला चिकटलेलं यश आयुष्यभर आनंद देते त्यामुळे शिक्षकांनी अद्यावत तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा करून द्यावा असा सल्ला दिला. शिक्षक नेते भरत रसाळे यांनी विश्वस्त म्हणून या संस्थेकडे पाहिले असलेने संस्था भविष्यात अनेक क्षितिज गाठेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डी सी कुंभार यांनी, कोल्हापूर जिल्हा शिष्यवृत्ती मध्ये अग्रेसर आहे, यामध्ये या पतसंस्थेचा वतीने घेत असलेल्या सराव परीक्षेचे मोठं योगदान असल्याचं सांगितलं. व कोल्हापूर महानगरपालिकेचे दोन वर्षातील आदर्श शिक्षक पुरस्कार लवकरच देण्यात येतील अशी माहिती त्यांनी दिली.*
शिक्षक नेते भरत रसाळे यांनी, संस्था सातत्यानं सभासद हिताचाच विचार करीत असल्याचं सांगून सध्या राज्यभरात वीस हजारांहून अधिक पतसंस्था आहेत.यामध्ये आपली संस्था अग्रेसर आहे हे अभिमानास्पद असल्याचं सांगितले.
संस्थेचे चेअरमन सात्ताप्पा कासार यांनी मागील एकतीस वर्षाच्या संस्थेच्या कार्याचाआढावा घेऊन.संस्थेकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.स्वागत संचालिका वर्षाराणी वायदंडे यांनी केले पाहुण्यांचा परिचय संचालक महादेव डावरे यांनी करून दिला, सूत्रसंचालन रोहिणी येडगे यांनी केले तर आभार व्हाईस चेअरमन अमित परीट यांनी मानले.
कार्यकमास मा. सचिव वसंत पाटील, यांच्यासह संचालक सर्वस्वी मच्छिंद्र नाळे, कृष्णा चौगले, सूर्यकांत बरगे , सर्जेराव नाईक, शिवाजी सोनाळकर, राजेश कोंडेकर, संतोष आयरे, राजेंद्र कोरे सल्लागार समिती सदस्य संभाजी सुतार, वसो वागरे, पंडित मस्कर, चंद्रकांत वाकरेकर, दशरथ कांबळे, सौ.विद्या पाटील, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी उपस्थित होते.