सुरेंद्र जैन परिवारातर्फे सीपीआरला एक हजार चष्मे प्रदान
schedule14 Jan 25 person by visibility 69 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर येथील नेत्र चिकित्सा शास्त्र विभागाकरिता उद्योजक सुरेंद्र जैन आणि परिवार यांच्यावतीने १ हजार चष्मे प्रदान करण्यात आले.
राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रमांतर्गत रुग्णांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया नंतर आवश्यक असणारे चष्मे दिले जातात दर महिन्याला ३०० ते ३५० मोतीबिंदू शस्त्रक्रिया सीपीआर हॉस्पिटलमध्ये मध्ये केल्या जातात. पण गेली काही महिने सदर चष्मे सरकारकडून प्राप्त न झाल्यामुळे रुग्णांची गैरसोय निर्माण झाली होती. या कारणाने छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय देणगी समितीच्या वतीने सुरेंद्र जैन यांच्याशी संपर्क साधून गैरसोयीबाबत सांगितले. जैन यांनी ग्नॅट फाउंड्री प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूरच्यावतीने देणगी स्वरूपात १ हजार चष्मे देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मंगळवारी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते एक १ हजार चष्मे प्रदान करण्यात आले. यावेळी सुरेंद्र जैन यांनी सरकारकडून निधी प्राप्त होईपर्यंत चष्म्यांचा पुरवठा ग्नॅट फाउंड्री प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर कंपनीकडून यांच्याकडून केला जाईल अशी जाहीर केले.
कार्यक्रमास शिरोली मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजू पाटील, गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम ,कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर, उपाध्यक्ष कमलाकर कुलकर्णी, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे , छाती रोग विभागाचे विभाग प्रमुख ,डॉ. अनिता साहेबांनावार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, नेत्ररोग विभागाच्या डॉ. पाटील ,देणगी समिती सचिव महेंद्र चव्हाण, समाजसेवा अध्यक्ष विभागप्रमुख बाजीराव आपटे, देणगी समिती सदस्य केदार ढेकणे, प्रशासकीय अधिकारी अजय गुजर उपस्थित होते. य समाजसेवा अध्यक्ष अजित भास्कर यांनी सूत्रसंचालन केले.