अधिकारी-कर्मचाऱ्यांची क्रिकेटची सामने, संतोष जोशी, अतुल आकुर्डे, सचिन सांगावकरांनी लुटला फलंदाजीचा आनंद
schedule14 Jan 25 person by visibility 275 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्यावतीने अधिकारी व कर्मचारी यांच्या वार्षिक क्रीडा स्पर्धेस प्रारंभ झाला. शास्त्रीनगर मैदानावर पुरुष क्रिकेट स्पर्धेला मंगळवारी झाली. स्पर्धेचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन. एस यांच्या हस्ते झाले.
पुरुष क्रिकेट स्पर्धेमध्ये एकूण चार गट आहेत. ही स्पर्धा साखळी पध्दतीने सामने होत आहेत. पहिला सामना पंचायत समिती करवीर विरुध्द मुख्यालय अ मध्ये झाला. त्यामध्ये करवीर पंचायत समितीचा संघ विजयी झाला.. दुसरा सामना मुख्यालय ब विरुध्द पंचायत समिती राधानगरीत झाला. या सामन्यात राधानगरी पंचायत समिती संघ विजयी झाला.. तीसरा सामना पंचायत समिती चंदगड विरुध्द हातकणंगले पंचायत समिती यांच्यामध्ये झाला. यामध्ये पंचायत समिती हातकणंगले संघ विजयी झाला.
चौथा सामना पंचायत समिती पन्हाळा विरुध्द शाहूवाडी पंचायत समितीत झाला. यामध्ये शाहूवाडी पंचायत समितीचा संघ विजयी झाला. पाचवा सामना पंचायत समिती चंदगड विरुध्द राधानगरी पंचायत समितीमध्ये झाला. यामध्ये पंचायत समिती राधानगरी विजयी झाला. सहावा सामना पंचायत समिती शाहूवाडी विरुद्ध पंचायत समिती करवीर यांच्यामध्ये झाला. यामध्ये शाहूवाडी संघ विजयी झाला. सातवा सामना पंचायत समिती चंदगड विरुद्ध मुख्यालय ब चंदगड पंचायत समिती संघ विजयी झाला.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी , मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन सांगावकर यांनी फलंदाजीचा आनंद लुटला. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी गोलंदाजी केली. उद्घाटना वेळी प्रकल्प संचालक माधुरी परीट, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अर्जुन गोळे उपस्थित होते.. पुढील सामने सोळा जानेवारी व २१ ते २३ जानेवारी २्०२५ या कालावधीत होणार आहेत. शास्त्रीनगर मैदानावर सामने होणार आहेत.