+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustहातकणंगले गटशिक्षणाधिकारीपदी रवींद्रनाथ चौगुले adjustघोडावत विद्यापीठात एम फार्म कोर्स सुरू adjustवारणा विद्यापीठ - टेलर्स युनिव्हर्सिटी मलेशिया यांच्यामध्ये सामंजस्य करार adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री
1001130166
1000995296
schedule02 Oct 24 person by visibility 122 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्सच्यावतीने ६ ऑक्टोबरला रामकृष्ण मल्टीपर्पज हॉलमध्ये रास रसिया दांडिया स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत बाराशे स्पर्धक सहभागी होणार आहेत. विविध गटातील विजेत्यांना एक लाखापेक्षा अधिक रकमेची बक्षीस देऊन गौरवण्यात येणार असल्याचे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षा  अरुंधती महाडिक आणि इनरव्हीलच्या अध्यक्षा गीता कदम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
 रास रसिया दांडिया  स्पर्धेसाठी बाल, युवा, तरुण आणि ज्येष्ठ नागरिक असे ४ गट तयार करण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी बाल गट सोडून इतरांना पाचशे रुपये फी असणार आहे. बेस्ट बॉय, बेस्ट गर्ल, बेस्ट चाइल्ड यासह विविध गटात एक लाखांपेक्षा अधिक बक्षीसांचे वाटप विजेत्यांना केले जाईल, असे सौ. अरुंधती महाडिक यांनी सांगितले. तसेच स्पर्धेतील प्रथम विजेत्यांना श्री अंबाबाई देवीची मानाची साडी दिली जाणार आहे. तसेच बंपर लकी ड्रॉ काढले जाणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी महाद्वार रोडवरील भांबूरे कलेक्शन, भेंडे गल्लीतील गणेश ट्रॅव्हल्स एजन्सी, ताराबाई पार्कातील अक्कीज बीस्ट्रो, राजारामपुरीतील कशिश कलेक्शन, नागाळा पार्कातील सिरॅफिक ब्युटी पार्लर येथे नाव नोंदणी करावी. दहा तिकिटे खरेदी केलेल्यांना १ तिकीट फ्री दिले जाणार आहे. सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत रास रसिया सुरू राहणार आहे. पत्रकार परिषदेला  यावेळी रोट्रॅक्ट क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्सच्या अध्यक्षा प्रेरणा जाधव, रोटरीचे ज्येष्ठ सदस्य बी. एस. शिंपूकडे, नेत्रा कुरबेट्टी, अकेत शहा, जिग्ना वसा, सुवर्णा गांधी, अश्विनी टेंबे उपस्थित होत्या.