राजू शेट्टींनी स्वत: फेटा बांधून केला अरुण डोंगळेचा सत्कार
schedule26 May 23 person by visibility 243 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ)चे नूतन चेअरमन अरुण डोंगळे यांच्यावर दुसऱ्या दिवशीही शुभेच्छांचा वर्षाव झाला. विशेष म्हणजे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी चेअरमन डोंगळे यांना स्वतः कोल्हापुरी फेटा बांधून आपुलकीचा सत्कार केला.
याप्रसंगी शेट्टी यांनी चेअरमन डोंगळे यांना शुभेच्छा दिल्या. ‘सामान्य दूध उत्पादकाशी नाळ असणारे नेतृत्व म्हणजे अरुणकुमार डोंगळे होय’असे कौतुकोद्गगार शेट्टी यांनी काढले. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ जालिंदर पाटील ,भगवान काटे उपस्थित होते.