+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule26 Nov 22 person by visibility 408 categoryआरोग्य
मोफत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व शस्त्रक्रियेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
“ह्रदयरोग रुग्णांना अत्यंत कमी त्रासात अत्याधुनिक उपचार मोफत मिळणारे एकमेव केंद्र म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटलचा लौकिक येणाऱ्या काळात होईल.” असे प्रतिपादन सिद्धगिरी मठाचे मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांनी काढले.
 सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विभागात दाखल झालेल्या अत्याधुनिक फिलिप्स अझोरियन मोस्ट ऍडव्हान्स कॅथलॅब’ मशिनच्या पूजनाप्रसंगी केले. यावेळी बोलताना स्वामी म्हणाले, “रुग्णांना मोठ्या शहरात मिळणारे अत्याधुनिक उपचार आता सिद्धगिरी सारख्या ग्रामीण भागातील रुग्णांना हि मिळत आहे आशादायक बाब आहे. सिद्धगिरी रुग्णालय कॅशलेस करण्याचा मानस आहे. भाग म्हणून ह्रदयरोग रुग्णासाठी मोफत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व शस्त्रक्रिया करताना या आधुनिक मशीनद्वारे मदत होणार आहे.”
सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. शिवशंकर मरजक्के म्हणाले, ‘फिलिप्स अझोरियन मोस्ट ऍडव्हान्स कॅथलॅब’ मशीन हे मुंबई ते बेंगळूर आदी परिक्षेत्रातील ट्रस्ट श्रेणीतील पहिल्यांदा अशी सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करणारे सिद्धगिरी हॉस्पिटल हे पहिले रुग्णालय आहे. या मशीनद्वारे केवळ हृदयरुग्णच नव्हे तर मेंदूच्या शस्त्रक्रीयेसोबतच जिथे जिथे शिरेद्वारे रक्तपुरवठा केला जातो त्या शरीतातील भागातील उपचार करणे अधिक सुखकर होणार आहे. या मशीनमुळे इतर मशिनच्या तुलनेत ६० टक्क्यापर्यंत रेडीएशनचा धोका कमी आहे. मशीनद्वारे अँजिओग्राफी करताना पुढील उपचाराची दिशा तत्काळ स्पष्ट होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा गरजू रुग्णांना नक्कीच होणार आहे.”
विश्वस्त उदय सावंत, उद्योजक सुरेंद्र जैन, डॉ. श्रीकांत कोले, डॉ.रमेश माळकर,डॉ. अभिजित शेळके, डॉ. शंतनू पालकर, डॉ.प्रकाश भरमगौडर,डॉ.वर्षा पाटील, डॉ. सौरभ भिरूड, डॉ.तनिष पाटील, डॉ. अविष्कार कढव, डॉ.समीर तौकारी, डॉ. सचिन पाटील, डॉ. आशिष महामुनी, डॉ. वैशाली सावंत आदी उपस्थित होते.