पार्श्वनाथ पतसंस्थेतर्फे पुढीलवर्षी सभासदांना भेटवस्तू देणार – शंकर पाटील
schedule26 Sep 23 person by visibility 198 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर पार्श्वनाथ पतसंस्था सुवर्णमहोत्सव साजरा करत आहे. सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सभासदांना पुढील वर्षी आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे अशी माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकर पाटील यांनी दिली. सभासदांना आठ टक्के लाभांश देण्याची घोषणाही त्यांनी केली.
पतसंस्थेची २५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. याप्रसंगी अध्यक्ष पाटील बोलत होते. ते म्हणाले, ‘पतसंस्थेच्या ठेवीमध्ये वाढ होत आहेत. सध्या एकूण ठेवी २८ कोटी आहेत.’ याप्रसंगी उपाध्यक्ष संजय शहा, राजाराम कारखान्याचे संचालक शिवाजी पाटील, बी. आर. पाटील, आयुब मुल्ला यांची भाषणे झाली. व्यवस्थापक जयवंत पाटील यांनी अहवाल वाचन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पाटील यांनी अहवाल वाचन केले. बळवंत हुजरे यांनी सूत्रसंचालन केले.सुर्यकांत शिर्के यांनी आभार मानले. यावेळी संचालक सचिन कोळी, अमर निरुखे, बाजीराव धनगर, मारुती सातपुते, सीमा शहा, मुग्धा चोडणकर उपस्थित होते.