+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule22 Jan 23 person by visibility 447 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
हातकणंगले शिक्षण विभाग पंचायत समितीच्यावतीने माणगांव येथील ए.पी.मगदूम हायस्कूल येथे सुवर्ण महोत्सवी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. सोमवारी (२३ जानेवारी) आणि मंगळवारी (२४ जानेवारी) असे दोन दिवस प्रदर्शन खुले राहणार आहे. तंत्रज्ञान आणि खेळणी असा विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय आहे.
 प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार प्रकाश आवाडे आणि आमदार राजूबाबा आवळे यांच्या हस्ते आणि खासदार धैर्यशील माने यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी हातकणंगले गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, जिल्हा परिषद उप शिक्षणाधिकारी गजान उर्किडे, माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती वंदना मगदूम, माजी पंचायत समिती सभापती सोनाली पाटील, माजी उप सभापती असिफ मुजावर, सरपंच अभयकुमार उर्फ राजू मगदूम, उप सरपंच अख्तर हुसेन भालदार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मंगळवारी सायंकाळी पारितोषिक वितरण आणि प्रदर्शनाचा समारोप श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी आमदार जयंत आसगांवकर, शिक्षक नेते दादासाहेब लाड, माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, शिक्षक बँकेचे अध्यक्ष अर्जुन पाटील, हातकणंगले पोलिस ठाण्याच्या पोलिस उप निरीक्षक सौ. एस.डि.बडे, कोजिमाशीचे संचालक जितेंद्र म्हैशाळे, श्रीकांत कदम, विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक रामचंद्र भोजकर, शशिकांत काटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी ए.पी. मगदूम हायस्कूलच्या मुख्याध्यापिका महानंदा कदम, गटशिक्षणाधिकारी जगन्नाथ पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी भारती कोळी, शालेय पोषण आहार अधीक्षक प्रविण फाटक, मुख्याध्यापक सागर चुडाप्पा, विज्ञान समिती अध्यक्ष सचिन कोंडेकरसह शिक्षण विभागाचे विविध घटक सहभागी आहेत.