तीस सप्टेंबरला एक दिवस गावाच्या स्वच्छतेसाठी
schedule20 Sep 23 person by visibility 443 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘स्वच्छ भारत मिशन’मिशन अंतर्गत ३० सप्टेंबर २०२३ रोजी ‘एक दिवस माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी’हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये हा उपक्रम राबविण्याच्या सूचना पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने दिल्या आहेत. सकाळी आठ ते दहा या वेळेत हा उपक्रम होणार आहे. या उपक्रमांमध्ये सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
या उपक्रमातंर्गत सगळयांनी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी एकत्र येऊन स्वच्छतेविषयक गावफेरी काढणार आहेत. तसेच घरातील वैयक्तिक घनकचरा, सांडपाणी यावर काय उपाययोजना करता येतील यासंबंधी प्रबोधन केले जाईल. पथनाटयाचेही आयोजन केले जाणार आहे. या उपक्रमांमध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, ग्रामस्थ, महिला बचत गट यांचा सहभाग असणार आहे.