+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule17 Sep 22 person by visibility 362 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यात जनावरांमध्ये वेगाने पसरत चाललेल्या लम्पीस्किन आजारासंदर्भात प्रशासनाने तत्काळ जिल्ह्यातील जनावरांचे लसीकरण पूर्ण करावे अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पशुसंवर्धन उप-आयुक्त डॉ.पठाण यांना दिल्या. लम्पी स्किन आजारासंदर्भात पशुसंवर्धन अधिकारी आणि कोल्हापूर जिल्हा म्हैसधारक व दुधविक्रेते असोसिएशनची आढावा बैठक पार पडली.
 बैठकीत क्षीरसागर यांनी, लम्पीस्कीन आजाराने बाधित गाईंची संख्या, त्यातून बरी झालेली जनावरे आणि सध्या उपचार सुरु असणारी जनावरांची माहिती घेतली. यासह या आजाराची लक्षणे गाई व्यतिरिक्त अन्य पाळीव प्राण्यामध्ये दिसून आली आहेत का? अन्य प्राणी बाधित झाले आहेत का? याचा आढावा घेतला. या रोगावरील उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्याला एक कोटींचा निधी सरकारने दिला असून, त्यातून आवश्यक जनावरांची औषधे, गोठ्यात फवारणीसाठीची औषधे मोफत पशुपालकांना पुरविण्यात यावीत. या आजारासंदर्भात पशुपालकांना योग्य ते मार्गदर्शन करावे. जिल्ह्यातील १२ तालुक्यात तात्काळ लसीकरणाची मोहीम राबवावी असेही क्षीरसागर यांनी सूचना केल्या.
याबाबत पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ.पठाण यांनी, जिल्ह्यात सध्या ६२ गायी या आजाराने ग्रस्त झाल्या होत्या. त्यातील २२ गायी बऱ्या झाल्या असून उर्वरित ४० गाईवर उपचार सुरु असल्याचे सांगितले. गायींना स्वतंत्र विलगीकरणकरून ठेवण्यात आले आहे. या आजाराच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यात एकही जनावराचा मृत्यु झाला नसल्याचे सांगितले. यासह हा आजार फक्त गाईमध्ये पसरला असून, यापासून अन्य कोणतेही जनावर बाधित झालेले नसल्याचे सांगितले. यासह शासकीय मदतीसाठी टोल फ्री नंबर १९६२ व १८००२३३०४१८ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले.
यावेळी पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त वडगावे, कोल्हापूर जिल्हा म्हैसधारक व दुधविक्रेते असोसिएशनचे अध्यक्ष संजय पाटील, बाळासाहेब चिले, राजेंद्र पाटील, युवराज बचाटे, बाबुराव मोहिते, गोगा पसारे, नंदू गवळी, प्रताप आडगुळे, सदानंद गवळी उपस्थित होते.