येवतीच्या विकासासाठी पी.एन.पाटील यांच्याकडून एक कोटी रुपयांचा निधी
schedule19 Apr 23 person by visibility 560 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :
येवती गावच्या विविध विकास कामासाठी आमदार पी. एन. पाटील सडोलीकर यांनी एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आगामी काळात हे गाव विकासाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पी पाटील सडोलीकर यांनी केले
येवती येथे अंबाबाई मंदिर सांस्कृतिक सभागृहाच्या बांधकाम शुभारंभ प्रसंगी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच वीरधवल पाटील होते. यावेळी विविध वक्त्यांची भाषणे झाली. गावात आयोजित केलेल्या हरिनाम सप्ताह समाप्ती निमित्त महाप्रसादाचे वाटप राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य किरण पाटील, उपसरपंच सौ.सुतार, मिलन पाटील, श्रीपतरावदादा बँकेचे संचालक रणजीत शेळके, संभाजी पाटील, बी.डी.पाटील, बी.के.शेळके, धनाजी पाटील, दशरथ पाटील, आर.के.शेळके, गणपतराव पाटील, पी.बी.पाटील, संदीप पाटील, कृष्णात शेळके, शरद आळवेकर, एकनाथ पाटील, उत्तम पाटील, शहाजी पाटील, शामराव सूर्यवंशी, सतीश पाटील, टी.आर.पाटील, साताप्पा गुरव, शामराव नाळे, आनंदा वायदंडे, अरविंद पाटील, बाळासो वायदंडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.