+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustपी.जी. शिंदेंचे सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र adjust गाेकुळ शेतकऱ्यांच्या श्रमाचे-कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक-डॉ.अरुण शिंदे. adjustमोदींच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास राहिला नाही ! इंडिया आघाडी बाजी मारणार !! adjustजिल्हा परिषदेमध्ये महाराष्ट्र दिन साजरा adjustजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustयात्रा, शाळेतील जेवणामध्ये दुग्धजन्य पदार्थांचा समावेश नको-डॉ. राजेश गायकवाड adjust गोकुळ दूध संघाच्या प्रधान कार्यालयात रक्तदान शिबिर adjustचेतन नरके गटाचा शाहू छत्रपतींना पाठिंबा ! विरोधकांना जाहीरपणे तराटणी!! adjustसदाशिवराव मंडलिकांचे पांग फेडण्याची हीच योग्य वेळ-हसन मुश्रीफ adjustशिक्षक भारती संघटनेच्या उपाध्यक्षपदी काकासाहेब भोकरे
1000255522
Screenshot_20240226_195247~2
schedule18 Mar 24 person by visibility 126 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : २०१५-२०१९ चे वाजवी भाडे ठरत नाही तोवर गाळेधारक कोणतेही भाडे भरणार नाहीत असा एकमुखी निर्णय कोल्हापूर चेंबरच्या झालेल्या सभेत गाळेधारकांनी घेतला. गाळेधारक भाडे आणि सुरक्षा ठेव निर्धारण समितीची बैठक होती.
 चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी या संबंधीची माहिती दिली. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी समितीच्या बैठकीत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचा प्रस्ताव न स्वीकारता  २७ ऑगस्ट २०१५ चा ठराव क्र. ४३ व  १४ सप्टेंबर २०१५ चा ठराव क्र. ८६ नुसार गाळेधारकांचे  २०१५ ते २०१९ चे भाडे ठरविण्यात येणार आहे असे महानगपालिकेतर्फे बैठकीत सांगण्यात आले. या निर्णयास मी व मानद सचिव अजित कोठारी यांनी या सभेत विरोध दर्शविला अशी माहिती अध्यक्ष संजय शेटे यांनी दिली. 
 कोल्हापूर चेंबरतर्फे २०१५ ते २०१९ चे भाडे निश्चित करा. मग २०१९ नंतरच्या भाड्याचे काय करायचे ते पाहू अशी भुमिका मांडली. त्यावेळी मुद्रांक जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी या समितीला २०१५ ते २०१९ चे भाडे ठरविण्याचा अधिकार नाही असे सांगितले.
 चेंबरचे मानद सचिव अजित कोठारी यांनी गाळेधारकांनी एकत्रित राहून नोटीसा आल्यास न घाबरता चेंबरशी संपर्क साधावा. त्या नोटीसी बाबत काय निर्णय घ्यायचा ते आपण एकत्रित बसवून ठरवू असे सांगितले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज गाळेधारकांच्या हितासाठी नेहमी पाठीशी राहील अशी ग्वाही दिली.
 यावेळी चेंबरचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, कॅटचे राष्ट्रीय उपाध्यक्ष धैर्यशील पाटील, मानद सचिव वैभव सावर्डेकर, जयेश ओसवाल, प्रशांत शिंदे, संचालक संपत पाटील, बबन महाजन, संदीप वीर  उपस्थित होते.