अवघ्या सहा तासात उलघडला खुनाचा गुन्हा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कामगिरी
schedule01 Dec 25 person by visibility 45 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने, अवघ्या सहा तासात खुनाच्या गुन्हयाचा उलघडा केला. एक डिसेंबर २०२५ रोजी पहाटे गोखले कॉलेज ते हॉकी स्टेडीयम जाणारे रोडवर विश्वपंढरी समोर फुटपाथवर इलेक्ट्रिक पोलला केबलव्दारे गळा आवळून संशयास्पदरित्या खून झाला असल्याची माहिती मिळाली असता उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण व त्यांचे पथक, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण लोंढे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाची माहिती घेतली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, व अपर पोलीस अधीक्षक धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक सागर वाघ, जालिंदर जाधव यांची तपास पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणणेच्या दिल्या. तपास पथकाने क्षणाचाही विलंब न लावता घटनेच्या ठिकाणी जाणा येणारे मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक पुराव्याचे अधारे माहिती घेत असताना जालिंदर जाधव यांच्या पथकातील पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना हा खून मनिष राऊत, (कळंबा रिंग रोड, राऊत कॉलनी,) यांनी केला असल्याचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली असता पथकाने त्यास कळंबा रिंग रोड परिसरातून तात्काळ शोध घेवून त्यास पकडले.
त्याच्याकडे तपास केला असता त्याने सिध्दू शंकर बनवी, (वय २० वर्षे, रा. वाशी नाका, कळंबा रिंग रोड) सोबत जेवन करण्यासाठी गेले. यावेळी त्या दोघांमध्ये दारूच्या नशेत वाद झाला. त्यावेळी सिद्धू बनवीने राऊतला आईवरून शिवी दिली. राऊते रागाच्या भरात रस्त्याच्याकडेला असलेल्या इलेक्ट्रिक पोलला लटकत असलेल्या केबलने सिध्दू बनवीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली.या तपासात प्रमुख अधिकाऱ्यांसह पोलीस अंमलदार वैभव पाटील, सुरेश पाटील, योगेश गोसवी, समीर कांबळे, रोहीत मर्दाने, संतोष बरगे, परशुराम गुजरे, संजय हुंबे, हिंदुराव केसरे, महेश खोत, सतिश जंगम, संदिप बेंद्रे, महेश पाटील, सागर माने, विनायक चौगुले, प्रदिप पाटील, युवराज पाटील, अमित सर्जे, सतिश सुर्यवंशी यांचा सहभाग होता.