Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरातील रस्ते क्वाॅलिटीचेच हवेत, किती खाणार - पोट फुटेल? राजेश क्षीरसागरांनी कंत्राटदारांना खडसावले, अधिकाऱ्यांना डिसेंबर अखेरची डेडलाईन!!संगीत मैफलीतून भारतीय संविधानाचा जागरच्च थथथव्यापार-व्यवसायाची यशस्विता वयावर नव्हे तर धाडसावर अवलंबून – जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडेस्टार्टअप उद्यमींसाठी आस्क मी एनीथिंग, केआयटीचा अभिनव उपक्रमप्रकरण पेपर फुटीचे…चर्चा शिक्षक -प्राध्यापक- प्राचार्यांच्या कारनाम्याची ! पगार गलेलठृठ मात्र अध्यापनापेक्षा नेतेगिरी जास्त !खेलो इंडियात कोल्‍हापूरच्‍या भक्तीचा पदकांचा चौकार, संस्‍कृतीला कांस्‍यडीवाय पाटील कृषी-तंत्र विद्यापीठाला बेस्ट क्लीन अँड ग्रीन कॅम्पस पुरस्कारजिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष नानासाहेब गाट यांचे निधनतीन देशातील फुटबॉल मूल्यांकनासाठी अंजू तुरंबेकर यांची नियुक्ती

जाहिरात

 

कोल्हापुरातील रस्ते क्वाॅलिटीचेच हवेत, किती खाणार - पोट फुटेल? राजेश क्षीरसागरांनी कंत्राटदारांना खडसावले, अधिकाऱ्यांना डिसेंबर अखेरची डेडलाईन!!

schedule01 Dec 25 person by visibility 147 categoryमहानगरपालिका

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरुस्ती व पायाभूत सुविधावरुन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी महापालिकेत बैठक घेऊन अधिकारी व कंत्राटदारांना चांगलेच खडसावले. 31 डिसेंबर 2025 पर्यंत शहरातील सगळे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत. यामध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही खपवून घेतली जाणार नाही. सगळे रस्ते उत्कृष्ट दर्जाचे झालेच पाहिजेत असा सज्जड दमही त्यांनी भरला. कंत्राटदारांनी सुद्धा आपण शहरवासीयांचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून रस्त्यांची कामे करावेत. प्रत्येक वेळी किती खाणार,  खाऊन खाऊन पोट फुटेल अशा शब्दांमध्ये आमदार क्षीरसागर यांनी कंत्राटदारांना सुनावले. शंभर कोटीच्या रस्ते कामाच्या सद्यस्थितीचा आढावाही घेतला. यावेळी कंत्राटदारांकडून 16 पैकी 13 रस्त्यांचे काम 80 टक्के झाले आहे. उर्वरित ठिकाणी तांत्रिक बाबीमुळे कामे पूर्ण झाले नाहीत असे निदर्शनास आणले.
 यावर शहरातील रस्त्यांचे कामे आणि दर्जावरून आमदार क्षीरसागर यांनी अधिकारी व कंत्राटदारांना स्पष्टपणे सूचना केल्या. 100 कोटीचे रस्ते,  जिल्हा नियोजन समितीमधून कोल्हापूर उत्तर व दक्षिण मतदार संघातील रस्त्यासाठी मंजूर झालेले 22 कोटी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते कामासाठी दिलेले 22 कोटीचा निधी या सगळ्या कामांची माहिती घेतली. निधी प्राप्त होऊन ही ज्या रस्त्यांच्या कामासाठी वर्क ऑर्डर दिली नाही, त्या कामांची वर्क ऑर्डर तात्काळ देऊन 31 डिसेंबर पर्यंत कोल्हापूर शहरातील सगळे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजेत असे त्यांनी स्पष्टपणे बजावले. रस्त्याच्या कामात हलकर्जीपणा व निकृष्टता खपवून घेतली जाणार नाही. शंभर कोटीच्या निधीतून होणाऱ्या सगळ्या रस्त्यांची सद्यस्थिती नागरिकांना कळवा किती टक्के काम झाले हे कोणत्या रस्त्यांची कामे झाले आहेत कोणते कामे सुरू आहेत या संदर्भात लोकांसमोर माहिती मांडा असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
 कोल्हापूर शहरातील वाहतूक व्यवस्था व पार्किंगची सुविधा,  मैदाने,  उद्यान, शाळा सुस्थितीत असल्या पाहिजेत. ओपन स्पेस ताब्यात घेऊन त्या ठिकाणी नागरिकांच्या करता चांगल्या सुविधा निर्माण करा तसेच मैदानांचा सर्वे करण्याच्या ही सूचना केल्या. जुना बुधवार पेठेत खेळाडूंना मैदान उपलब्ध करून देण्यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.  महापालिकेने,  सीएसआर फंडातून कोल्हापूर शहरातील चौक सुशोभित करण्यासंदर्भात पुढाकार घ्यावा. कारखानदार,  उद्योजकांच्या सोबत आपण बैठका घेऊ या शब्दात त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आश्वासित  केले.
 राजाराम पार्क येथील अनाधिकृत बांधकामाचा मुद्दा माजी नगरसेवक किरण नकाते यांनी मांडला. त्यावर आमदार क्षीरसागर यांनी, " अधिकाऱ्यांनी नियमानुसार काम करावे.  नियमबाह्य पद्धतीने कोणी बांधकाम केले असेल तर कारवाई झालीच पाहिजे. कोणी दादागिरी करत असेल तर खपवून घेऊ नका. आपण अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहू" अशी ग्वाही दिली.
 शंभर कोटीच्या रस्ते कामावरून आमदार क्षीरसागरांनी  कंत्राटदारांना  चांगलेच सुनावले. रस्ते व्यवस्थित करण्याची जबाबदारी तुमची आहे. कारणे खपवून घेतली जाणार नाहीत. तुमच्या निष्काळजीपणे लोकप्रतिनिधींची अब्रू जाते. रस्ते कामात हलगर्जीपणा केला तर त्यांच्या बिलांना ब्रेक लावा अशा सूचना आमदारांनी केल्या. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शहर विकासाच्या योजना प्रभावीपणे राबविण्याचे सूचना केले आहेत. कामात चुका, दिरंगाई झाली तर खपवून घेतले जाणार नाही. कामाला विलंब  झाल्यामुळे पालकमंत्री संतप्त झाले होते याची आठवण ही क्षीरसागर यांनी या बैठकीत करून दिली
 रंकाळा तलावात मिसळणारे सांडपाणी रोखण्यासाठी दोन कोटी सात लाख रुपयांचा प्रकल्प राबवण्यासंदर्भात त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रंकाळा तलावाचे सुशोभीकरण व सौंदर्यीकरणावर भर देण्यास सांगितले. फाउंटन कारंजा कामाचाही आढावा घेतला. संध्यामठ नजीक सेल्फी पॉइंट उभारता येईल का या संदर्भात अभ्यास करावा.  संध्यामठ या हेरिटेज वास्तूला धक्का न लावता,  नियमात बसेल या पद्धतीने सेल्फी पाॅईंट उभारता येईल का यासाठी अधिकाऱ्यांनी चाचणी करावी असेही ते म्हणाले. खानविलकर पेट्रोल पंप ते बावडा पर्यंत होणाऱ्या नवीन रस्त्याच्या संदर्भात दिलेल्या टीडीआर विषयी तक्रारी येत आहेत त्याची चौकशी करावी अशा सूचना त्यांनी प्रशासकांना दिल्या. कसबा बावडा येथे विकास काम करताना काहीजण विरोध करतात असा मुद्दा बैठकीत चर्चा आला त्यावर आमदार क्षीरसागर यांनी चार दोन लोकांनी विरोध केला म्हणून विकास कामे थांबवू नका. विकासकामात अडथळे कोण आणते, हे लोकांना माहीत आहे असे सांगितले. बैठकीला अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ शिल्पा दरेकर शहर अभियंता रमेश मस्कर, हर्षजीत घाटगे, विलास साळुंखे, एन एस पाटील, महादेव फुलारी, समीर व्याघ्रांबरे आधी उपस्थित होते

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes