डॉ. अमृतकुवर रायजादे यांना वूमन ऑफ पॅशन’ पुरस्कार
schedule30 Nov 25 person by visibility 18 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कोल्हापूरच्या प्राचार्या डॉ. अमृतकुवर रायजादे यांना बेळगाव येथे पार पडलेल्या इंटरनॅशनल फिजिओथेरपी कॉन्फरन्समध्ये ‘वूमन ऑफ पॅशन (एंटरप्रेन्युरियल एक्सलन्स)’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
केएलई विद्यापीठ, बेळगाव येथे इंटरनॅशनल फिजिओथेरपी कॉन्फरन्स ‘पर्ल फिजिओकॉन २०२५’आयोजित करण्यात आली होती. ‘शेपिंग द फ्युचर : टेक्नोलॉजी ड्रीव्हन पेशंट केअर’ या विषयावर झालेल्या परिषदेत जगभरातील १२०० हून अधिक प्राध्यापक, विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी काहेरचे कुलपती डॉ. प्रभाकर कोरे, कर्नाटक राज्य सहयोगी आणि आरोग्य सेवा परिषदेचे अध्यक्ष डॉ. इफ्तिखार अली, केंद्र सरकारच्या जीओथेरपी व्यावसायिक परिषदेचे सदस्य डॉ. अली इराणी, डॉ. व्हि.पी गुप्ता, डॉ. आशिष कक्कड, डॉ. केतन भाटीकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आयोजित विविध स्पर्धामध्ये महाविद्यालयाच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यानी यश मिळवले. यामध्ये डॉ. अदिती जाधव यांनी पीएचडी कॅटेगरी पेपर प्रेझेंटेशनमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला. पेपर प्रेझेंटेशनमध्ये स्नेहा पाटील यांनी (स्पोर्ट्स फिजिओथेरपी) प्रथम क्रमांक, रेवती चव्हाण (पेडियाट्रिक फिजिओथेरपी ) द्वितीय क्रमांक, हर्षिता पाटील(न्यूरो फिजिओथेरपी) द्वितीय क्रमांक, विनायक कुरळे (न्यूरो पिजी) प्रथम क्रमांक, सुनैना लाड (ओ.एम. टी पिजी ) प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाचा लौकिक वाढवला आहे . प्राचार्या डॉ. अमृतकुवर रायजादे आणि सर्व सहकारी यांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले आहे.