शिवाजी विद्यापीठाचा ऋषी देसाई ठरला खेलो इंडियातील वेगवान धावपटू
schedule01 Dec 25 person by visibility 5 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : राजस्थानमधील जयपुर येथे सुरू असलेल्या पाचव्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२५ मध्ये शिवाजी विद्यापीठाने सुवर्णमय कामगिरी केली. शंभर मीटर धावणे या स्पर्धेत पुरुष विभागात ऋषी प्रताप देसाई याने १० .५३ सेकंदाची वेळ नोंदवत सुवर्णपदकासह या स्पर्धेतील वेगवान धावपटू होण्याचा बहुमान पटकावला. मंगळवारी, अथलेटिक्स मधील दुसऱ्या दिवशी शिवाजी विद्यापीठाचा मिक्स रेल्वेचा संघ सहभागी होत असून तीन व चार डिसेंबर रोजी ११० मीटर अडथळा रेस, ८०० मीटर धावणे,,भालाफेक, ३००० मीटर स्टीपल चेस, ४×१०० मीटर रिले रेस मध्ये शिवाजी विद्यापीठ सहभागी होणार आहे. संघाचे प्रशिक्षक प्राध्यापक रामा पाटील व डॉ इब्राहिम मुल्ला तसेच संघ व्यवस्थापिका शिला मोहिते यांनी विद्यार्थ्यांचे सराव सत्र घेऊन योग्य मार्गदर्शन केले आहे. संघास पथक प्रमुख डॉ एन डी पाटील हे प्रोत्साहित करत आहेत. सोमवारी, एक डिसेंबर रोजीच्या सुवर्णपदकांमुळे शिवाजी विद्यापीठाचा संघ २०० सहभागी विद्यापीठांमध्ये १० व्या क्रमांकावर आलेला आहे पथक प्रमुखांनी याबाबत पहिल्या पाचमध्ये क्रमांक पटकावण्याचा मनोदय व्यक्त केला. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी प्रभारी प्र कुलगुरू डॉ. ज्योती जाधव कुलसचिव डॉ. विलास शिंदे व क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.