Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जुनी पेन्शनसाठी साखळी उपोषण : शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलनजिल्हा परिषद शिवसेनेच्या गटनेतेपदी अरुण जाधव ! यड्रावकर गट शिवसेनेसोबतच!! कोल्हापूरकरांचे प्रेम हे कलावंताला प्रेरणादायी: अभिनेते सुनील बर्वे शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात अंकुरम स्पर्धा, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभागउमराणीतील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारक सुशोभिकरणाचा नियोजनबद्ध प्रस्ताव सादर करावाशाहू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत गुरुवारी  मंत्रालयात बैठकमहापालिकेत पुन्हा सत्तासंघर्ष !अकरा मार्चला स्थायी, परिवहनच्या सभापतीची निवड !!शाहू महाराज हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून वैज्ञानिक प्रयोगसंजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या चेअरमनपदी नंदिप मोरे, व्हाईस चेअरमनपदी जयकुमार रेळेकर

जाहिरात

 

व्यापार-व्यवसायाची यशस्विता वयावर नव्हे तर धाडसावर अवलंबून – जेनेरिक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे

schedule30 Nov 25 person by visibility 449 categoryउद्योग

ब्राह्मण बिझनेस फोरमच्यावतीने ‘ब्रह्मउर्जा २०२५’ पुरस्कार वितरण उत्साहात  

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर   : ‘ उद्योग-व्यवसायाची यशस्विता ही वयावर अवलंबून नसते. तर नवनवीन आव्हाने स्विकारण्याची आणि समोर जे धोके उभे ठाकतात त्यांना सामोरे जाऊन मात करण्यासाठी आवश्यक धाडस महत्वाचे असते. व्यवसाय करताना मानवतावादी दृष्टीकोन महत्वाचा आहे. जेनेरिक आधारच्या माध्यमातून माफक दरात औषधे उपलब्ध करुन शाश्वत मदत देण्याचा प्रयत्न केला.’असे उद्गगार जेनेरिक आधारचे संस्थापक व तरुण उद्योजक अर्जुन देशपांडे यांनी काढले.

कोल्हापुरातील ब्राह्मण बिझनेस फोरमच्यावतीने ‘ब्रह्मउर्जा २०२५’ उद्योग परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेमध्ये ब्राह्मण समाजीतल विविध क्षेत्रातील मान्यवरांना उत्कृष्ट उद्यमशीलता पुरस्कारांनी सन्मानित केले. यामध्ये हॉटेल व्यावसायिक सचिन शानबाग, बांधकाम व्यावसायिक विजय पत्की, कारखानदार नितीन वाडीकर, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रोहिणी परांडेकर, व वेदगुरु सुहास जोशी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. क्रिकेट समालोचक सुनंदन लेले यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. मानपत्र, शाल, श्रीफळ, पगडी असे पुरस्काराचे स्वरुप ओ. हॉटेल सयाजी येथे शुक्रवारी (३० नोव्हेंबर) दिवसभर ही परिषद झाली. दरम्यान जेनेरेक आधारचे संस्थापक अर्जुन देशपांडे यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. नरेंद्र जोशी व प्रा. क्षितिजा ताशी यांनी मुलाखत घेतली.

‘जेनेरिक आधार हीच माझी फॅमिली आहे. लोकांना निम्म्या किंमतीत औषधे उपलब्ध झाली.  त्यांचे आशीर्वाद लाभले. ते खूप मोठे आहे.’ असे नमूद करत देशपांडे यांनी,‘ नागरिकांना काय हवे ते जाणून व्यवसाय करा. सतत फिरत राहा, लोकांशी बोला. याद्वारे नवनवीन गोष्टी कळतात. भारतात खूप संधी आहेत, आपण त्या शोधल्या पाहिजेत. असे नमूद केले. या मुलाखतीतून देशपांडे यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी व्यवसाय सुरू केलेला व्यवसाय, उद्योगपती रतन टाटा यांची भेट, त्यांनी माझ्यासारख्या तरुण व्यावसायिकसोबत केलेली भागीदारी, देशभरात तीन हजाराहून अधिक आऊटलेटस, ३०० हून अधिक शहरात विस्तारलेला व्यवसाय आणि पंधराशे कोटीपर्यंत वाढलेली उलाढाल असे विविध पैलू उलगडले. रतन टाटा यांच्यासोबतच्या भेटी आपणाला प्रत्येकवेळी नवीन काही शिकवणाऱ्या होता. मुळात रतन टाटा ही एक व्यक्ती नसून विचार आहे. त्यांचा मानवतावादी दृष्टीकोन आपणाला खूप भावतो.

क्रीडा समालोचक लेले म्हणाले, ‘आपण आपला उद्योग करतांना सामाजिक जाणीवांचे भान नेहमी ठेवले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करा, नेहमी देण्याची वृत्ती ठेवा, माणसांना जोडा, तसेच यश हे नेहमी सामूहिक असते हे नेहमी लक्षात ठेवा.’ ‘ब्राह्मण बिझनेस फोरम’चे अध्यक्ष   प्रसाद धर्माधिकारी यांनी प्रास्ताविक केले. अजिंक्य देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. सतीश पत्की, दिलीप गुणे, संतोष पंडित, अभिजीत कुलकर्णी, शैलेश देशपांडे, राजेश छत्रे, अजिंक्य देशपांडे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes