+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjust शाहू छत्रपतींनी मानले आभार, जनतेच्या पाठिंब्यामुळे विजय निश्चित ! adjustमतदान केंद्रावर हाणामारी, महायुती-महाविकासचे कार्यकर्ते भिडले adjustचुरशीने मतदान, जिल्हयात अकरा वाजेपर्यंत 23 टक्के मतदान adjust मतदान केंद्रासाठी पथके रवाना, मतदानासाठी ३९८६ मतदान केंद्र सज्ज adjustअधिकाऱ्यांची संकल्पना, जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर मतदान केंद्रांची स्थापना ! adjustमुंबईत राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन adjustलोकराजाला करवीरच्या जनतेकडून अभिवादन ! adjustजैन मठात दहा मेला महामस्तकाभिषेक महोत्सव adjustविधानसभेला मुश्रीफ की समरजितराजेसोबत राहणार ? मालोजीराजेंचा मंडलिकांना थेट सवाल adjust न्यू पॉलिटेक्निकचा ऑटोमोबाईल असोसिएशनशी सामंजस्य करार
Screenshot_20240226_195247~2
schedule05 Mar 24 person by visibility 205 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कोल्हापूर महापालिकेचे २०२४-२५ या वर्षाचे नवीन १२६१.११ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक  प्रशासक आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी मंगळवारी सादर केले. घरफाळा आणि पाणीपट्टी करामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ नसल्याने नागरिकांना दिलासा मिळालेला आहे. तसेच काही सुविधांचे दर कमी प्रमाणात वाढवण्यात आले आहेत.
 पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी एसटीपी प्रकल्प उभारण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच शहराची वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी मल्टीलेवल कार पार्किंग, पाणी उपसा करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर ,पाणीपुरवठा मेन लाईनवरील व्हाॅल्व्ह बदलणे, रंकाळा येथे बोटॅनिकल गार्डन या सुविधा केल्या जाणार आहेत.
नवीन अर्थसंकल्पीय अंदाजात अव्वल शिल्लकेसह महसूली व भांडवली अपेक्षित जमा रक्कम ८६८.०६ कोटी रुपये असून खर्च ८६७.८४ कोटी रुपये अपेक्षित आहे. तसेच विशेष प्रकल्पाअंतर्गत सुरु असलेल्या कामांचे जमा खर्चाचे स्वतंत्र अंदाज सोबत सादर केले असून त्यामध्ये जमा ३४६.५१ कोटी कोटी रुपये अपेक्षित असून खर्च ३४४.३८ कोटी रुपये अपेक्षित आहे. महिला व बालकल्याण निधी व केंद्रीय वित्त आयोगाचे एकत्रित स्वतंत्र पत्रक अंदाजपत्रकामध्ये दर्शविण्यात आले आहे. वित्त आयोगाअंतर्गत एकूण जमा ४६.५४ कोटी रुपये अपेक्षित असून खर्च ४६.०६ कोटी अपेक्षित आहे. याप्रमाणे महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प, वित्त आयोग मिळून एकूण १२६१.११ कोटी इतके जमेचे अर्थसंकल्पीय अंंदाजपत्रक सादर करण्यात आले.
 काळम्मावाडी, शिंगणापूर, नागदेववाडी, बालिंगा उपसा केंद्रामध्येे उच्च शक्तीचे पाणी उपसा पंप असुन महिन्याला साधारणत: वीज देयकापोटी रुपये चार कोटी इतका भार महापालिकेच्या तिजोरीवर पडतो. यासाठी प्रायोगिक तत्वावर सौर उर्जेवर चालणारे पंप बसवुन देयकाचा भार कमी करण्याचा महापालिका प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी चालु आर्थिक वर्षात अंदाजपत्रकात तरतुद करण्यात येत आहे.
   कोल्हापूर तिर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत ७९.९६ कोटीच्या कामांना राज्य सरकारची प्रशासकीय मान्यता झाली आहे. पहिल्या टप्प्यातील १०.६० कोटी निधी मनपास प्राप्त झाला आहे यामधून बहुमजली पार्किंगचे काम पुर्णत्वास आले आहे. याव्यतिरिक्त ४०कोटी निधी फेब्रुवारी २०२४ मध्ये वितरीतसाठी मंजूरी झाली आहे. यामध्ये सरस्वती टॉकीजनजीकचे पार्किंग जागेत तिसरा ते पाचवा मजला पार्किंग, सहावा व सातवा मजला भक्त निवास, ५० लोकांचे उपाहारगृह यांचा समावेश आहे. तसेच व्हीनस टॉकीज गाडी अड्डा येथे पार्किंग विकसीत करणे या कामांचा समावेश आहे.
     रंकाळा तलाव परिसर विकास या कामासाठी मुलभुत ९.८४ कोटी प्राप्त आहे. या कामाअंतर्गत संपूर्ण रंकाळ्याला परिक्रमा पूर्ण होण्यासाठी पदपथ करणे, चार ठिकाणी प्रवेशव्दारे, प्रसाधनगृहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दुचाकी व चारचाकी पार्किंगची व्यवस्था करणे, लॅन्डस्केपींग व विद्युत रोषणाई कामे करणे रंकाळा टॉवर ते तांबट कमान पर्यंत तलावाच्या भिंतीचे संवर्धन करणे या कामाचा समावेश आहे. तसेच प्रादेशिक पर्यटन योजनेमधून ४.८० कोटी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये दगडी भिंत, टॉवर, संध्यामठ, धुण्याची चावी परिसर यांचे जतन संवर्धन इ. कामांचा समावेश आहे. 
पेंट द सिटी वॉल अभियानांतर्गत शहरातील प्रमुख रस्ते डिव्हायडर, कपौंड वॉल वर शहरातील ऐतिहासिक स्थळे, सामाजिक, प्रबोधन संदेश, शहराची वैशिष्टये रंगविणेत आली आहेत. नवीन आर्थिक वर्षामध्ये हे अभियान पुन्हा राबविण्यात येत आहे. अंदाजपत्रकामध्ये याकामी १५ लाख तरतूद करण्यात आली आहे. 
अंबाबाई मंदिराभोवती ऐतिहासिक प्रकारचे आकर्षक व ध्वनीयुक्त विद्युत खांब बसविण्यात येणार आहेत. या कामासाठी २.६५ कोटी इतका निधी प्राप्त आहे. हेरिटेज वॉक व विद्युत रोषणाईसाठी अंदाजपत्रकामध्ये याकामासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे.  रंकाळा महोत्सवासाठी अंदाजपत्रकामध्ये २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.