+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustहातकणंगले गटशिक्षणाधिकारीपदी रवींद्रनाथ चौगुले adjustघोडावत विद्यापीठात एम फार्म कोर्स सुरू adjustवारणा विद्यापीठ - टेलर्स युनिव्हर्सिटी मलेशिया यांच्यामध्ये सामंजस्य करार adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री
1001130166
1000995296
schedule15 Oct 24 person by visibility 63 categoryआरोग्य
अत्याधुनिकीकरण केलेल्या दंतचिकित्सा विभागाचे हस्तांतरण
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनच्या प्रकल्पांतर्गत अत्याधुनिकरण केलेला सावित्रीबाई फुले रुग्णालयातील दंतचिकित्सा विभाग आता उत्तम प्रकारे सेवा देईल. अशा महत्वाच्या आणि समाजोपयोगी कार्यात महापालिका प्रशासन नेहमीच रोटरीच्या बरोबर असू, असे मत महापलिका आयुक्त के. मंजु लक्ष्मी यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउन आणि कोल्हापूर रोटरी मोमेंट 2020-21 यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले रुग्णालया मध्ये रोटरी च्या समाजोपयोगी प्रकल्पांतर्गत सात लाख 50 हजार खर्चून अत्याधुनिकरण केलेल्या दंतचिकित्सा विभागाचा हस्तांतरण सोहळा रोटरीचे माजी प्रांतपाल संग्राम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी के. मंजूलक्ष्मी बोलत होत्या.
याप्रसंगी संग्राम पाटील यांनी रोटरीच्या आतापर्यंतच्या सर्व कार्याचा आढावा घेतला. यावळी रोटरी मिडटाउनचे सेक्रेटरी बी.एस. शिंपुकडे, लोक कल्याण मंडळाच्या अध्यक्षा उत्कर्षा पाटील, प्रकल्प अध्यक्ष डॉ. दिग्विजय पाटील, डॉ. विकास पाटील, शिवाजी भोसले, सचिन लाड, श्रीकांत झेंडे, अकेत शहा, अनिकेत अष्टेकर, रितु वायचळ, अजित ठाणेकर, शरद पाटील, रोटरी मोमेंटचे अध्यक्ष बाबा जांभळे, आदी उपस्थित होते.