+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Screenshot_20240226_195247~2
schedule28 May 23 person by visibility 192 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : 
 नागदेववाडी (ता. करवीर) पैकी जिल्हा परिषद कॉलनी येथील जिल्हा परिषद गृहनिर्माण सोसायटी, येथे रोटरी क्लबचा आर. सी. सी. क्लब (रोटरी कम्युनिटी कॉर्पस्) म्हणजेच रोटरी ग्रामसेवा केंद्र सुरू करण्यात आले. 
रोटरी क्लब ऑफ होरायझन कोल्हापूर यांनी हा क्लब पुरस्कृत केला आहे. ‘आर सी सी क्लब ऑफ श्री नागेश्वर होरायझन’, असे या रोटरी ग्रामसेवा केंद्राचे नामकरण करण्यात आले असून. रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० चे होऊ घातलेले गव्हर्नर रो. नासिर बोरसादवाला यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा मोठ्या उत्साहात  झाला. 
 सोसायटीचे सचिव प्रा. एस. टी बावडे यांनी स्वागत केले. रोटरी क्लब ऑफ होरायझनचे प्रेसिडेंट रो. संजय साळोखे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. मुख्य कार्यक्रमात रोटरी इंटरनॅशनल कडून प्राप्त झालेले क्लब स्थापनेचे प्रमाणपत्र समन्वयकअजित तांबेकर यांना सुपूर्द केले. सदस्यांना ‘सदस्य प्रमाणपत्र’ या प्रसंगी देण्यात आले.  नासिर बोरसादवाला,  प्रवीण कुंभोजकर यांच्या हस्ते प्रा. विक्रम यमगेकर यांची अध्यक्षपदी, प्रा. एस. एल. पाटील यांची सचिवपदी व प्रसाद पोतदार यांची खजानिसपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. जिल्हा परिषद कर्मचारी हौसिंग सोसायटीच्या वतीने चेअरमन  अनंत खोपडे यांनी क्लब स्थापनेबद्दल आनंद व्यक्त केला  प्रवीण कुंभोजकर यांनी क्लब स्थापनेची उद्दिष्ट्ये सांगितली. 
प्रा. डी. बी. गायकर यांनी सूत्रसंचालन केले. श्री नागेश्वर होरायझनचे सचिव प्रा. एस. एल. पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी क्लबचे सागर बकरे, अवधूत चिकोडी, अभयसिंह बिचकर,. संदीप पवार, जिल्हा परिषद गृहनिर्माण सोसायटीचे बी. के. जाधव, विलास गायकवाड, अभिजित कुईगडे, अमर जगताप, अमर माळी, दीपक पाटील, जयदीप खाडे, महेश चव्हाण, निलेश म्हाळुंगेकर, डी. एस. पाटील, निरंजन चव्हाण, राजेंद्र सरनोबत, शिवाजी डुबल, सुरेश यादव, विकास तांबेकर  उपस्थित होते.