Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात साहित्यिक, प्राध्यापकांनी उगारली सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात निषेधाची मूठगोकुळतर्फे वारकऱ्यांना सुगंधी दुधाचे वाटप, पुईखडी परिसरात स्वच्छता मोहीमसोहळा भक्तीचा…भाव सेवेचा !धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, अखेर सरकार नमलेकोल्हापुरातील कवी - लेखक - प्राध्यापक – शिक्षक एकवटले, शनिवारी करणार धरणे आंदोलन ! जंतरमंतरवरील तरुणांचे वाढविणार मनोबल!शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशाकांत कोल्हापूर देशात द्वितीय स्थानावरभारतीय मजदूर संघाचा ७२ वा वर्धापनदिन  साजरा,शिवसाई मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना होतकरू मुलांच्या स्वप्नांना बळ देणारी - डॉ. संपत खिलारी महिला नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीशील शेतकरी बनतील - शौमिका महाडिक४१० दूध संस्थेविषयी शौमिका महाडिकांचे प्रेम हे पुतना मावशीचे, सभासदांचे पत्रक

जाहिरात

 

कोल्हापुरात साहित्यिक, प्राध्यापकांनी उगारली सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात निषेधाची मूठ

schedule25 Jul 26 person by visibility 9 categoryसामाजिक

दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्य लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात शनिवारी २५ जुलै २०२६ साहित्यिक, कवी, प्राध्यापक-शिक्षक, कलावंत व सामाजिक कार्यकर्ते एकवटले. राजर्षी शाहू समाधी स्थळ येथे धरणे आंदोलन करत केंद्र सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाचा निषेध केला. यावेळी मान्यवरांच्या भाषणाद्वारे ‘झेन जीने नवं आंदोलनाची दिशा दाखविली. सरकारलाही नमवू शकतो’हा आत्मविश्वास देशवासियांत जागविला. ही नव्या बदलाची, नव्या वाटचालीची सुरुवात आहे. त्याला एक चळवळीचे स्वरुप देऊ या.’असा निर्धार करण्यात आला.

नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद प्रधान यांच्या  राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या या आंदोलनावर पोलिसांनी लाठीमार केला. विद्यार्थ्यांची अडवणूक केली. सरकार पातळीवरुन जवळपास तीन आठवडे कोणताही संवाद नव्हता. असा आक्षेप ठेवत कोल्हापुरातील साहित्यिक, कवी, प्राध्यापक, शिक्षक, कलावंत व सामाजिक कार्यकर्त्यांनी शनिवारी धरणे आंदोलन करण्यात आले. सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाचा निषेध करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांवरील लाठीमार प्रकरणी सरकारचा धिक्कार केला. नीट पेपर फुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आता टीईटी पेपर फुटी प्रकरणी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

‘देशातील तरुण पिढीने हे नवं आंदोलन पुकारत सत्ताधीशांना नमविले. झेन जीची आंदोलनाची भाषा नवी ऊर्जा जागविणारी आहे. या तरुण पिढीने सिनीअर मंडळींना जे जमले नाही ते करुन दाखविले. ’अशी मनोगत झाली. झेन जीचे आंदोलन म्हणजे नव्या बदलाची सुरुवात आहे असे अनेकांनी नमूद केले. जंतरमंतरवरील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरात उत्स्फूर्त आंदोलने झाली. मोर्चे झाले. सभा झाल्या. आता या साऱ्या प्रक्रियेला चळवळीचे स्वरुप देण्यासाठी पुन्हा पुन्हा सारे जण एकत्र येऊ या. अशी साद मान्यवरांनी घातली. साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे,  डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. राजन गवस, डॉ. बी. एम. हिर्डेकर, डॉ. माया पंडित, डॉ. राजेंद्र कुंभार यांनी मार्गदर्शन केले. डॉ. भारत पाटणकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. आमदार जयंत आसगावकर यांनी सरकारी धोरणावर टीका केली.

 कॉम्रेड धनाजी गुरव, संपत देसाई, डॉ. मोहन पाटील, उदय नारकर, आनंद विंगकर, एकनाथ पाटील, कृष्णात खोत, डॉ. नितीन शिंदे, संजय बनसोडे,  कृष्णात स्वाती, श्रीधर चैतन्य, अनमोल कोठडीया, प्रवीण बांदेकर, वीरधवल परब, गोविंद काजरेकर, नामदेव माळी, कवी गोविंद पाटील, रफीक सूरज, श्यामसुंदर मिरजकर, महेश कराडकर, किरण गुरव, जयसिंग पाटील, सुभाष कोरे, चंद्रशेखर कांबळे, संतोष जगताप,  पाटलोबा पाटील, दि.बा. पाटील, डॉ. राजीव चव्हाण, महेश पेडणेकर, राहुल कदम,  चंद्रकांत बाबर, साहिल कबीर, सुधाकर सावंत, राहुल पवार, उमेश देसाई, संभाजी बापट, मनोज रणदिवे, प्रसाद पाटील, गौतम वर्धन, रवी राजमाने, अभिजित पाटील, बाळासाहेब कांबळे, अ‍ॅड. कृष्णा पाटील, कविता ननावरे, सुप्रिया आवरे, धनाजी घोरपडे, रमजान मुल्ला, शरद आजगेकर, विष्णू पावले, रंगा कांबळे, धर्मवीर पाटील, रविंद्र गुरव, विष्णू पावले, विक्रम वागरे,विक्रम राजवर्धन, कृष्णा भारतीय, प्रशांत नागावकर, डॉ नवनाथ शिंदे, विजय कांबळे, राजेंद्र कांबळे, डी के पाटील आदी सहभागी होणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes