+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule02 Sep 22 person by visibility 527 categoryक्रीडा
 कोल्हापूरला प्रथमच मान
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : 
अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवर युवराज मालोजीराजे   छत्रपती यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. फुटबॉल फेडरेशनवर मालोजीराजे यांच्या रूपाने प्रथमच कोल्हापूरला मान मिळालेला आहे. त्यांच्या निवडीमुळे कोल्हापूरच्या फुटबॉल विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
जागतिक पातळीवरील फुटबॉल संघटना असलेल्या फिफाने अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवर बंदी घातली होती. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले होते अखेर फुटबॉल फेडरेशनची आज 2022 ते 2024 या चार वर्षाच्या कालावधीसाठी निवडणूक झाली. पस्तीस राज्यांच्या प्रतिनिधी या निवडणुकीत भाग घेतला. 23 सदस्यांची कार्यकारणी निवडण्यात आली.
अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रसिद्ध फुटबॉलपटू बायचुंग भुतिया याचा पराभव करून कल्याण चौबे अध्यक्ष झाले. उपाध्यक्षपदी एन ए हरीस तर कोषाध्यक्षपदी कियाअजय यांची निवड झाली. सदस्यपदी के.एस. ए.चे अध्यक्ष आणि विफाचे उपाध्यक्ष मालोजी राजे यांची बिनविरोध निवड झाली. विफाने महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून मालोजीराजे यांची निवड केली.त्यांच्याबरोबर जी.पी. पहूंगा अविजीत पाॅल , अनिल कुमार, वळंका नताशा अलिकाॅ, मेनला इंथेफा, मोहन लाड ,अरिफ अली, नेबो सरवोसे, लालंगदिग्लोबा हमर, दीपक शर्मा , विजय बावी, सय्यद हुसेन, सय्यद अली तनवी यांची बिनविरोध निवड झाली . या निवडीबद्दल मालोजीराजे यांना श्रीमंत शाहू महाराज यांचे प्रोत्साहन लाभले त्यांच्या निवडीबद्दल कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन जिल्ह्यातील फुटबॉल संघ, खेळाडू, माजी खेळाडू ,आणि फुटबॉल शौकिनांकडून अभिनंदन वर्षाव होत आहे.