महालक्ष्मी भक्त मंडळ गणेशोत्सवास प्रारंभ ! युवराज मालोजीराजे, मंत्री मुश्रीफांच्या हस्ते आरती !!
schedule19 Sep 23 person by visibility 278 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज् वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात श्री महालक्ष्मी भक्त मंडळाच्या १३३ व्या गणेशोत्सवाच्या आरतीचा शुभारंभ वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि श्रीमंत युवराज मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले. अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडप नूतनीकरण सुरू असल्याने यंदा प्रथमच मंदिराच्या आवारात मंडप उभारून आणि आकर्षक आरास करून गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना आली आहे.
‘करवीर निवासिनी अंबाबाई देवालय हे शक्तीपीठ आहे. आई अंबाबाईने सेवेची संधी दिल्यास देवालयाच्या विकासासह भक्तांच्या सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी नाविन्यपूर्ण काम करून दाखवू, असा विश्वास मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, महालक्ष्मी देवीची ख्याती संपूर्ण देशभर आहे. श्री महालक्ष्मी भक्त मंडळांनी अखंड १३३ वर्ष या गणेशोत्सवाची परंपरा मोठ्या भक्तीभावाने चालविली आहे. या मंडळाला अन्नछत्र आणि इतर बाबतीत असलेल्या समस्या सोडवण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करू.’
यावेळी बोलताना माजी आमदार श्रीमंत मालोजीराजे छत्रपती म्हणाले, महालक्ष्मी भक्त मंडळाच्या गणेशोत्सवाला एक आगळीवेगळी परंपरा आहे. मंडळांने धार्मिक परंपरा जोपासतानाच विधायक सामाजिक कार्यातून कोल्हापूरकरांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आहे. जिथे सर्वसामान्याना समस्या असतात, तिथे मदतीसाठी भक्तमंडळ सदैव अग्रेसर असते.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव, केडीसीसी बँकेचे संचालक भैया माने, प्रा. जयंत पाटील, आदिल फरास यांचीही भाषणे झाली. यावेळी अंबाबाई देवालय देवस्थान समितीचे प्रशासक सुशांत बनसोडे, बाबासाहेब कांबळे, मंडळाचे अध्यक्ष राजू मेवेकरी, उपाध्यक्ष विजय पवार, संजय जोशी, प्रमोद भिडे, नंदकुमार मराठे, अनिल जाधव, एस. के. कुलकर्णी, वैभव मेवेकरी, रणजीत मेवेकरी, संजय बावडेकर, मधुसूदन उर्फ किरण धर्माधिकारी, अमित जाधव, सुनील जोशी, सौ. हर्षदा मेवेकरी - जाधव, श्रीमती ज्योती जाधच्उ पस्थित होते.