+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule16 Jan 23 person by visibility 405 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २३ जानेवारी २०२३ रोजी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने शहरात विविध ठिकाणी महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली. या महाआरोग्य शिबिरांच्या नियोजनाकरिता महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेच्या अधिकारी आणि योजनेअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांच्या प्रतिनिधींची बैठक आज शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, येथे पार पडली.
 बैठकीच्या सुरवातीस क्षीरसागर यांनी महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेच्या सद्यस्थितीचा आठावा घेतला. यावेळी माहिती देताना जिल्हा समन्वयक रोहित खोलखंबे यांनी या योजनेअंतर्गत ५६ रुग्णालये समाविष्ठ असून, यामध्ये ९ शासकीय रुग्णालयांचा समावेश असल्याची माहिती दिली.  
 महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ठ रुग्णालयातील काही रुग्णालयांबाबत सातत्याने नागरिकांच्या तक्रारी येत असतात. सदर रुग्णालयाचे नागरिकांशी असणारे वर्तन आणि उपचार पद्धती तात्काळ सुधारण्याच्या सूचना जिल्हा समन्वयक यांनी द्याव्यात. शासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा लाभ नागरिकांना मिळण्यासाठी जनआरोग्य योजना समन्वयक आणि मदत कक्ष प्रमुखांनी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.
  यावेळी शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, जनआरोग्य योजना जिल्हा समन्वयक रोहित खोलखंबे, जिल्हा समन्वयक रेणुका वडुलेकर, वैद्यकीय अधिकारी चेतन खाडे, सुपरवायझर तेजस पायमल, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख कृष्णा लोंढे उपस्थित होते.