Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
करवीरमधील ७० दूध संस्थांची सुनावणी, पन्हाळा- गगनबावडातील दूध संस्थांना नोटीसपदवीधर मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे : आमदार राजेश क्षीरसागरनवकार महामंत्र पठण कार्यक्रमात जिल्ह्यात ३४ हजार जणांचा सहभागप्रायव्हेटच्या चेअरमनपदी डॉ. सुनील कुबेर, व्हाइस चेअरमनपदी मिलिंद करमळकरसरकारी योजना विनाविलंब लोकांपर्यंत पोहोचवा, जिप उपाध्यक्षांच्या अधिकाऱ्यांना सूचनारामसिना ग्रुपमध्ये माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांची प्रेरणादायी भेटमहापालिकेत आता प्रभाग समिती सभापतिपदासाठी धुमशानसर्किट बेंचमध्ये गोकुळविषयी पुढील सुनावणी २७ -२८ एप्रिलला, दुग्ध विभागाकडे दूध संस्थांच्या सुनावणी शिवाजी विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी दिपक काशीद, उपाध्यक्षपदी राकेश डोंगरेशिक्षण सेवकांना सानुग्रह अनुदानबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठविणार- शिक्षण संचालक शरद गोसावी

जाहिरात

 

पदवीधर मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे : आमदार राजेश क्षीरसागर

schedule09 Apr 26 person by visibility 12 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित काम महायुती सरकारकडून सुरु असून, जनतेचा महायुतीवर संपूर्ण विश्वास आहे. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, याही निवडणुकामध्ये विरोधकांना चारीमुंड्या चीत करून या मतदार संघावर महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहन राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 आगामी पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेने पुणे पदवीधर मतदार संघा अंतर्गत येणाऱ्या पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर या पाच जिल्ह्यात प्रत्येक पात्र व जागरूक पदवीधराची मतदार नोंदणी करणे, त्याच्याशी शिवसेनेची नाळ जोडणे, स्वावलंबी बनविणे हा संकल्प केला आहे. आतापर्यंतच्या नोंदणीमध्ये संख्यात्मकदृष्ट्या कोल्हापूरने अग्रस्थान प्राप्त केले आहे. यापुढेही कोल्हापूर जिल्ह्यातून अशाच पद्धतीने जास्तीत जास्त नोंदणी करण्याचा शिवसेनेचा उद्देश आहे. ही निवडणूक निश्चितच महायुती म्हणूनच लढविली जाणार आहे. पाच जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या निवडणुकीत कोल्हापूरची दावेदारी कायम राहण्यासाठी शिवसेनेने जास्तीत जास्त मतदार नोंदणीचा उद्देश ठेवला आहे. मतदार नोंदणी करण्यासाठी पात्र पदवीधरांनी “शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर” या कार्यालयाशी संपर्क साधून आपली हक्काची व बहुमुल्य पदवीधर मतदार नोंदणी करावी, असे आवाहन ही आमदार क्षीरसागर यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes