Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसक्तीच्या टीईटी परीक्षेतून सवलत मिळण्यासाठी खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार - खासदार धैर्यशील मानेआरोग्य विभागात साफसफाई ! जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, सुप्रिया देशमुख निलंबित !!महामानवाच्या द्विजन्मशताब्दीचा सरकारला विसर ! क्रांतिबा जोतिबांचा वापर राज्यकर्त्यांकडून केवळ भाषणापुरताच ! !अशक्य ते शक्य करतात मुश्रीफ ! रामायणात दहा तोंडाचा रावण, बाजार समितीत अठरा तोंडाची रावणं !!कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी नानासो कांबळे-साकेकरसेवक संघाचे ठिय्या आंदोलन, प्रशासनाने घेतला पदोन्नतीचा निर्णयबाजार समितीत पदाधिकारी बदलाचे राजकारण दमदार ! सभापती - संचालक मंडळाची कामगिरी मात्र सुमार !!अंजू तुरंबेकर देणार भूतानच्या महिला फुटबॉलपटूना प्रशिक्षणश्रीराम पचिंद्रे यांच्या शाहू कादंबरीतील पाठ शालेय अभ्यासक्रमात

जाहिरात

 

महापालिकेत आता प्रभाग समिती सभापतिपदासाठी धुमशान

schedule09 Apr 26 person by visibility 61 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापौर, उपमहापौर आणि समिती सभापतीच्या निवडीनंतर आता महापालिकेत प्रभाग समिती सभापतिपदासाठीचा कार्यक्रम जाहीर झाला. येत्या १७ एप्रिल २०२६ रोजी या निवडी होणार आहेत. ९ ते १३ एप्रिल या कालावधीत सकाळी अकरा ते दोन या वेळेत अर्जांचे वितरण आहे. पंधरा एप्रिल रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. १७ एप्रिल रोजी दुपारी बारा वाजून पाच मिनिटाला अर्जांची छाननी आहे. यानंतर पंधरा मिनिटे माघारीसाठी मुदत दिली जाणार आहेत. दुपारी १२ वाजून वीस मिनिटानी सभापतिपदासाठी मतदान आहे.उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होणार आहे. प्रभाग क्रमांक एक गांधीमैदान विभागीय कार्यालय अंतर्गत पाच प्रभाग असून २१ सदस्य आहेत. प्रभाग क्रमांक दोन शिवाजी मार्केट विभागीय कार्यालय अंतर्गत पाच प्रभाग असून वीस सदस्य आहेत. बागल मार्केट विभागीय कार्यालय अंतर्गत पाच प्रभाग व वीस सदस्य आहेत. तर छत्रपती ताराराणी मार्केट विभागीय कार्यालय अंतर्गत पाच प्रभाग असून वीस सदस्य आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes