नवकार महामंत्र पठण कार्यक्रमात जिल्ह्यात ३४ हजार जणांचा सहभाग
schedule09 Apr 26 person by visibility 17 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर - जगात तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठा उभे असताना सर्वत्र शांती आणि सद्भाव निर्माण करण्याची ताकद भारतीय विचारांमध्ये आणि नवकार महामंत्रामध्ये असून हा मंत्र आता समाज मंत्र व्हावा आणि हीच भारताची जागतिक पातळीवर विधायक ओळख ठरेल अशा भावना आचार्य विजय अभय शेखर सुरिश्री लक्ष्मी सेन महास्वामी यांनी आपल्या हितगुजपर मनोगत व्यक्त केल्या.
भगवान महावीर जयंती महोत्सवाचे औचित्य साधून "जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन"च्यावतीने (जीतो) आयोजित नवकार महामंत्र सामुदायिक पठण कार्यक्रम भक्तीमय वातावरणात झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्य कार्यक्रम महासैनिक दरबार हॉलमध्ये पार पडला. जीतो कोल्हापूर चाप्टरचे अनिल पाटील यांनी या उपक्रमाची माहिती दिली. महापौर रूपाराणी निकम यांनीही उपस्थित राहून आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. शहर आणि ग्रामीण भागातील सर्व दिगंबर, श्वेतांबर, स्थानकवासी, तेरापंथी या सर्व पंथीय जैन मंदिर मध्ये नवकार महामंत्र पठण करण्यात आले . कोल्हापूर जिल्हयात ३४ हजार हुन अधिक लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात ललित गांधी,पद्माकर कापसे,नाना पाटील ,किरण मिठारी जयेश ओसवाल, माजी नगरसेवक ईश्वर परमार , राजू मंच, संजय उपाध्ये आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी कोल्हापूर चेअरमन रवी संघवी, मानद सचिव अनिल पाटील, समन्वयक जितेंद्र राठोड, राजीव परीख, रवींद्र देवमोरे, युथ विंग चेअरमन प्रतिक ओसवाल, लेडीज विंग माया राठोड गिरीष शहायांनी विशेष परिश्रम घेतले .