सर्किट बेंचमध्ये गोकुळविषयी पुढील सुनावणी २७ -२८ एप्रिलला, दुग्ध विभागाकडे दूध संस्थांच्या सुनावणी
schedule09 Apr 26 person by visibility 21 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघासंदर्भात दाखल याचिकेवरील सुनावणीत सर्किट बेंच कोल्हापूरने राज्य सरकारला प्रतिज्ञातापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने, म्हटले आहे की संचालक अपात्र संदर्भातील प्रतिज्ञापत्र २१ एप्रिलला तर १२०० संस्था संदर्भातील प्रतिज्ञापत्र २२ एप्रिला सादर करावेत. तसेच संचालक अपात्रतेसंदर्भातील सुनावण २७ एप्रिल तर १२०० संस्थांच्या संदर्भातील सुनावणी २८ एप्रिल रोजी होणार आहे.
दरम्यान सहायक निबंधक दुग्ध विभागाने अवसायानातील प्राथमिक दूध संस्थांना नोटिसा पाठवून सुनावणी सुरू केल्या आहेत. मंगळवारी आणि बुधवारी १०७ दूध संस्थांच्या सुनावणी पूर्ण झाल्या. यामध्ये आजरा तालुक्यातील ७७ तर करवीरमधील ३० संस्थांचा समावेश आहे. आतापर्यंत सात तालुक्यातील ५७२ प्राथमिक दूध संस्थांना त्यांचे म्हणणे मांडण्यासंबंधी नोटिसा पाठविल्या आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील ७४ संस्थांना २० एप्रिलपर्यंत म्हणणे सादर करावे लागणार आहे.