Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
घोडावत ऑलिम्पियाड स्कूलचे डॉ.होमी भाभा परीक्षेत यशसक्तीच्या टीईटी परीक्षेतून सवलत मिळण्यासाठी खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार - खासदार धैर्यशील मानेआरोग्य विभागात साफसफाई ! जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, सुप्रिया देशमुख निलंबित !!महामानवाच्या द्विजन्मशताब्दीचा सरकारला विसर ! क्रांतिबा जोतिबांचा वापर राज्यकर्त्यांकडून केवळ भाषणापुरताच ! !अशक्य ते शक्य करतात मुश्रीफ ! रामायणात दहा तोंडाचा रावण, बाजार समितीत अठरा तोंडाची रावणं !!कोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी नानासो कांबळे-साकेकरसेवक संघाचे ठिय्या आंदोलन, प्रशासनाने घेतला पदोन्नतीचा निर्णयबाजार समितीत पदाधिकारी बदलाचे राजकारण दमदार ! सभापती - संचालक मंडळाची कामगिरी मात्र सुमार !!अंजू तुरंबेकर देणार भूतानच्या महिला फुटबॉलपटूना प्रशिक्षणश्रीराम पचिंद्रे यांच्या शाहू कादंबरीतील पाठ शालेय अभ्यासक्रमात

जाहिरात

 

रामसिना ग्रुपमध्ये माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांची प्रेरणादायी भेट

schedule09 Apr 26 person by visibility 72 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर  : शहरातील रामसिना ग्रुपच्या कार्यालयात भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे यांनी नुकतीच भेट देऊन संपूर्ण  मार्गदर्शन केले. या भेटीमुळे संस्थेत उत्साहाचे आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.

याप्रसंगी आमरे यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील अनुभव मांडले. त्यांनी शिस्त, सातत्य, टीमवर्क आणि कठोर परिश्रम यांचे महत्त्व स्पष्ट करत, कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन आणि चिकाटी आवश्यक असल्याचे सांगितले.

त्यांच्या मार्गदर्शनातून उपस्थितांना उद्दिष्ट निश्चित करून त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे, समन्वय व विश्वास वाढवणे, तसेच आव्हानांना संधी म्हणून स्वीकारण्याचे मोलाचे धडे मिळाले.रामसिना ग्रुपतर्फे सचिन ओसवाल यांनी  अमरे यांचे स्वागत केले.. त्यांच्या भेटीमुळे रामसिना ग्रुप ला  भविष्यात अधिक उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes