करवीरमधील ७० दूध संस्थांची सुनावणी, पन्हाळा- गगनबावडातील दूध संस्थांना नोटीस
schedule09 Apr 26 person by visibility 40 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळशी संलग्न त्या १२०० प्राथमिक दूध संस्थाची पात्रतेसंदर्भात सध्या सुनावणी सुरू आहे. सहायक निबंधक दुग्ध विभागाच्या कार्यालयात रोज विविध तालुक्यातील दूध संस्थांना सुनावणीला हजर राहून म्हणणे मांडण्याची संधी दिली जात आहे. गुरुवारी, ९ एप्रिल २०२६ रोजी करवीर तालुक्यातील ७० प्राथमिक दूध संस्थांची सुनावणीची प्रक्रिया झाली. सहायक निबंधक सुजय कदम यांच्यासमोर सुनावणीची प्रक्रिया सुरू आहे. संस्था प्रतिनिधींनी वकिलामार्फत कागदपत्रे सादर केली. काही जणांनी स्वत म्हणणे मांडले. दरम्यान पन्हाळा तालुक्यातील ७९ व गगनबावडा तालुक्यातील ३३ प्राथमिक दूध संस्थांची सुनावणी २२ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. त्या अनुषंगाने त्या संस्थांना नोटिसा लागू केल्या आहेत.