Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात रंगणार ‘मराठी चित्रपटगीत महोत्सव, रसिकांसाठी प्रवेश विनामूल्यइंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशनतर्फे गुरुवारी राज्यस्तरीय शिक्षक सन्मान सोहळापशुधनासाठी विमा योजना, पशुपालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभप्राधिकरणच्या सीईओंच्या कामकाजाची चौकशी करा,  आमदार राजेश क्षीरसागर यांचे मुख्य सचिवांना पत्रमहायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ 24 सप्टेंबरला ! आठ ऑक्टोबरला पॅनेलची घोषणा, अदृश्य शक्ती लुप्त झाली !!गोकुळच्या संचालक पदासाठी आमदारही मैदानात, अशोक माने यांचा अर्ज दाखलगोकुळसाठी भाजपचे शक्ती प्रदर्शन, २५ जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल ! इच्छुक वाढल्याने यादी लांबली !!रविकिरण इंगवलेंना तत्काळ अटक करा; शिवसेना पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणीकेआयटी कॉलेजमध्ये प्रथम वर्ष ‘इंडक्शन प्रोग्राम २०२६-२७’ उत्साहातगोकुळच्या 25 जागेसाठी भाजप उमेदवारी अर्ज दाखल करणार ! निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढणार !!

जाहिरात

 

शिक्षण सेवकांना सानुग्रह अनुदानबाबत सरकारकडे प्रस्ताव पाठविणार- शिक्षण संचालक शरद गोसावी

schedule08 Apr 26 person by visibility 319 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यातील शिक्षण सेवकांचा दुर्देवाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना सानुग्रह अनुदान मंजूर होण्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे लवकरच पाठविण्यात येईल अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी नुकतीच महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळास दिली.
 संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने, या पाच - सहा वर्षात अनेक शिक्षण सेवक मयत झाले मयत झाले आहे. ते त्यांच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्ती असल्याने त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे आर्थिक व मानसिक संकट ओढवले जाते. शिक्षणसेवक योजनेअंतर्गत सध्या अशा प्रकरणांमध्ये सानुग्रह अनुदानाची कोणतीही तरतूद नसल्याने संबंधित कुटुंबे अडचणीत येतात. त्यामुळे अशा प्रकरणांसाठी रु. 20 लाख सानुग्रह अनुदान व इतर सहाय्य योजना तातडीने लागू करण्यात यावी अशी मागणी शिक्षण संचालक यांचेकडे केली असता संचालकांनी वरील ग्वाही दिली. शिष्टमंडळात राज्य नेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्य कोषध्यक्ष जी एस मंगनाळे, उपाध्यक्ष अनिल उत्तरवार, इरफान मिर्झा, प्रमोद मुकेमवार, गोकुळ चारथळ, देवराव आमोदे, आदी सहभागी होते. यावेळी प्राथमिक शिक्षकांना बी एल ओ सह इतर सर्व अशैक्षणिक कामातून मुक्त करून फक्त विद्यार्थ्यांना शिकवू द्यावे यासह विविध शैक्षणिक मागण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असे राज्याध्यक्ष पाटील यांनी म्हटले आहे.     

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes