+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान adjustसज्जनशक्ती परिषदेत अजित ठाणेकरांच्या उमेदवारीचा जागर
1001130166
1000995296
schedule17 Jul 24 person by visibility 118 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरात दहा ऑगस्ट २०२४ रोजी वकील परिषद होणार आहे. मुंबई हायकोर्टाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्यासाठी सहा जिल्ह्यातील वकील या परिषदेत आंदोलनाची दिशा ठरविणार आहेत. वकील परिषद कोल्हापुरात भरविण्याचा निर्णय कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या सर्वसाधारण सभेत झाला. बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. सर्जेराव खोत यांच्या अध्यक्षतेखाली न्यायसंकुलातील राजर्षी शाहू सभागृह येथे सभा झाली.
खोत म्हणाले, ‘गेली चार दशके खंडपीठासाठी लढा सुरू आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हयासाठी हे खंडपीठ उपयुक्त ठरणार आहे. किमान सर्किट बेंच होण्यासाठी आंदोलन पुकारले आहे. वकील परिषदेत आंदोलनाची दिशा ठरविली जाईल. महासैनिक दरबार हॉल येथे ही परिषद होईल. ’
महाराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशन कौन्सिलचे सदस्य अॅड विवेकानंद घाडगे, अॅड. समीलउल्ला पाटील, अॅड. प्रकाश मोरे, अॅड. सतीश खोतलांडे, अॅड. किरण पाटील, अॅड. अजित मोहिते, अॅड. रणजित गावडे, अॅड. राणाप्रताप सासने. अॅड. आसावरी कुलकर्णी यांनी वकील परिषद यशस्वी करण्याच्या अनुषंगाने विविध सूचना केल्या. अॅड. निशिकांत पाटील यांनी स्वागत केले. सहसचिव राजू ओतारी यांनी आभार मानले. याप्रसंगी निशिकातं पाटोळे, उमेश माणगावे, कर्णकुमार पाटील, चंद्रकांत कुरणे आदी उपस्थित होते.