+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Screenshot_20240226_195247~2
schedule30 Jan 23 person by visibility 368 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : 
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर कामगार प्रतिनिधी म्हणून दिलीप लोखंडे व इम्तियाज मुनशी यांची निवड झाली. बँकेचे अध्यक्ष व आमदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. या निवडीबद्दल आमदार मुश्रीफ यांच्या हस्ते संचालक मंडळाच्यावतीने या दोघांचा सत्कार झाला.
         बँकेमध्ये दोन मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना आहेत. दिलीप लोखंडे हे बँक एम्प्लाॕईज युनियनचे प्रतिनिधी आहेत. इम्तियाज मुनशी हे कोल्हापूर डिस्ट्रीक्ट बँक एम्प्लाॕईज युनियनचे प्रतिनिधी आहेत. यावेळी उपाध्यक्ष आमदार राजूबाबा आवळे, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने, ए. वाय. पाटील, प्रताप ऊर्फ भय्या माने, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, संतोष पाटील, प्रा. अर्जुन आबिटकर, रणवीरसिंग गायकवाड, विजयसिंह माने, श्रुतिका काटकर, स्मिता गवळी आदी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.