+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री adjustकोरे अभियांत्रिकीतील प्राध्यापकांना भारत सरकारचे कॉपीराईट नोंदणी प्रमाणपत्र adjustदेशमुख शिक्षण समूहात विजेत्या शिक्षकांचा सत्कार adjustरोटरी क्लब ऑफ कोल्हापूर इव्हॉल्वतर्फे हेल्पर्समधील दहा शिक्षकांचा सन्मान adjustसज्जनशक्ती परिषदेत अजित ठाणेकरांच्या उमेदवारीचा जागर
1001130166
1000995296
schedule23 Jul 24 person by visibility 174 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे शहरातील  विविध भागांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. सुरक्षेच्या उपाययोजना म्हणून नागरिकांचे स्थलांतराची तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र व  आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना सोबत घेऊन .  पुराचा फटका बसणार्‍या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी पाहणी केली. शुक्रवार पेठेतील गायकवाड वाडा, जगद्गुरु शंकराचार्य मठ, गवत मंडई परिसरात सर्वप्रथम पुराचे पाणी शिरते. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, अग्निशामक दलाचे प्रमुख मनिष रणभिसे यांच्यासह अग्नीशामक दलाचे कर्मचारी आणि कृष्णराज महाडिक यांनी गायकवाड वाडाजवळ राहणार्‍या कुटुंबीयांची भेट घेतली. पुराच्या काळात रोगराई वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे महापालिका यंत्रणेकडून धूर, औषध फवारणी करण्याबाबत त्यांनी सुचना केल्या. तसेच शंकराचार्य मठाच्या परिसरातील आणि गवत मंडईत परिसरातील नागरिकांचे स्थलांतरण करण्यासाठी उत्तरेश्वर पेठेतील शाळेची पाहणी केली आहे. 
या सर्व परिसराची स्वच्छता करून स्थलांतरीत नागरिकांना मुलभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी महाडिक यांनी सूचना केल्या. तसेच कृष्णराज महाडिक यांचा मित्रपरिवार पूरबाधित नागरिकांच्या मदतीसाठी सदैव सज्ज असेल, असं सांगण्यात आलं. स्थलांतरीत नागरिकांना ब्लँकेटस्, कोरडा खाऊ यासह आवश्यक ती मदत मिळते की नाही, हे पाहण्याची जबाबदारी आपल्या मित्रमंडळींवर असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी जयदीप घरपणकर, राज माने, पृथ्वीराज मोरे, कुणाल भणगे, हरीश पाटील, सिद्धार्थ शिराळे, सुमित चौगुले, विशाल शिराळे  उपस्थित होते.