+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustहातकणंगले गटशिक्षणाधिकारीपदी रवींद्रनाथ चौगुले adjustघोडावत विद्यापीठात एम फार्म कोर्स सुरू adjustवारणा विद्यापीठ - टेलर्स युनिव्हर्सिटी मलेशिया यांच्यामध्ये सामंजस्य करार adjustग्रंथ जगण्याची प्रेरणा देतात - समीर देशपांडे adjustकृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !! adjustकेएमसी कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन adjustप्रख्यात भूलतज्ज्ञ डॉ. शकील मोमीन यांना जीवनगौरव पुरस्कार, केएमएतर्फे वीस ऑक्टोबरला वितरण adjustजितो कोल्हापूरचा पदग्रहण समारंभ दिमाखात ! अध्यक्षपदी रवी संघवी, मुख्य सचिवपदी अनिल पाटील, खजानिसपदी सिताराम कोरडे !! adjustकोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे दोन दिवसीय केएमए-कॉन परिषद adjust दूध विक्रीत गोकुळचा नवा उच्चांक , कोजागिरीनिमित्त 18 लाख 65 हजार लिटर दूध विक्री
1001130166
1000995296
schedule12 Oct 24 person by visibility 112 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : सांस्कृतिक परंपरा जपणारं शहर म्हणजे कोल्हापूर, दसरा सोहळा म्हणजे कोल्हापूरचे वैभव, अशा या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी याही वर्षी दसरा चौकात उत्सव प्रेमी जनतेची, भाविक तसेच पर्यटकांची उपस्थिती लक्षणीय होती. पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात मावळतीच्या सुवर्णकिरणांच्या साक्षीने दिमाखात साजरा झाला.
   कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला यावर्षीही जिल्हा प्रशासनाकडून जागतिक स्तरापर्यंत नेण्याचा मानस ठेवून संपुर्ण नवरात्रोत्सवादरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या पुढाकाराने कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव तसेच गौरवशाली परंपरा असलेला दसरा सोहळा दिमाखात साजरा झाला.
  दसरा चौकात करवीर निवासिनी अंबाबाई, जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी व छत्रपती शिवाजी महाराज आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह आगमन झाले. यानंतर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व कुंटुंबातील सदस्यांचे परंपरागत पध्दतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. यावेळी पोलीस विभागाच्या बँड पथकाने करवीर संस्थानचे गीत वाजवून त्यांचे स्वागत केले. दसरा महोत्सव समितीच्यावतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. पारंपरिक पध्दतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. दसरा सोहळ्यामध्ये श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन झाले.  युवराज संभाजीराजे छत्रपती, महाराज कुमार मालोजीराजे छत्रपती, यौवराज शहाजीराजे छत्रपती, श्रीमंत यशराजराजे छत्रपती यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले
  या सोहळयास पालकमंत्री हसन मुश्रीफ, पद्मश्री प्रतापसिंह जाधव, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी.शिर्के, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, महापालिका आयुक्त डॉ. के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, संजय डी.पाटील, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, श्रीराम पवार आदी उपस्थित होते. यावेळी प्रसन्न मालेकर यांनी उपस्थितांना दसरा सोहळ्याबद्दल माहिती दिली.
मिरवणुकीने वेधून घेतले लक्ष - मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, धनगरी ढोल, महिलांचे लेझीम, रणमर्द मावळ्यांचे पथक, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही लवाजम्यात निघालेल्या मिरवणुकीने उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. 
schedule05 Oct 22 person by visibility 590 categoryसामाजिक
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर   : करवीर नगरीत पारंपरिक विजयादशमीचा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात दिमाखात साजरा झाला. श्री शाहू महाराज छत्रपती व संभाजीराजे छत्रपती यांच्या सहकार्याने, दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव यावर्षी भव्य स्वरुपात अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाला.
  दसरा सोहळ्यामध्ये श्री शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते शमीपूजन झाले. यानंतर छत्रपतींच्या कुटुंबातील युवराज संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती व यशस्विनीराजे छत्रपती यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले. 
तत्पूर्वी करवीर निवासिनी अंबाबाई जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह आगमन झाले. यानंतर शाहू महाराज व कुंटुंबातील सदस्यांचे परंपरागत पध्दतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. 
सोहळयास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत  पाटील, माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ, आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार जयश्री जाधव, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ.डी. वाय. पाटील, संपादक पद्मश्री डॉ.प्रतापसिंह जाधव, संपादक श्रीराम पवार, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी.शिर्के, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, डॉ. संजय डी.पाटील, दसरा महोत्सव समितीचे विक्रमसिंह यादव, दिग्विजयराजे भोसले, बाबा चव्हाण, माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, राजेंद्र चव्हाण, प्रसन्न मोहिते उपस्थित होते. 
      मिरवणुकीने वेधून घेतले लक्ष सजवलेले उंट, मावळ्यांच्या वेशभूषेतील घोडेस्वार, शिवकालीन युद्धकलांची व मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, इतिहासाच्या स्मृती जागवणारे पोवाडे, पारंपरिक पद्धतीने निघालेल्या देवीच्या पालख्या अशा शाही लवाजम्यात मिरवणूक निघाली.  मिरवणुकीत सामाजिक संदेश देणारे चित्ररथ तसेच तालमींचे कुस्तीगीर सहभागी झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा एनसीसीचे विद्यार्थी उभे होते. कार्यक्रमांचे नियोजन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली दसरा नियोजन समिती सदस्य उदय गायकवाड, प्रमोद पाटील, प्राचार्य महादेव नरके, अजेय दळवी, आदित्य बेडेकर , ऋषिकेश केसकर, सुखदेव गिरी यांनी केले.