+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustशहरातील झोपडपट्टीधारकांचे प्रश्न निकाली काढू : राजेश क्षीरसागर adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Screenshot_20240226_195247~2
schedule19 Oct 22 person by visibility 302 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : रोटरी क्लबतर्फे शहरातील दहा क्षयरुग्णांना सहा महिन्यांकरीता दत्तक घेऊन त्यांना पोषण आहार (फुड बाक्सेट) देण्यात येणार आहे.
“क्षय बाधीत रुग्णास सामान्य रुग्णांपेक्षा प्रोटिनची भरपुर मात्रा असलेला सकस आहार मिळणे अत्यंत गरजेचे असते. अशा गरीब, गरजु रुग्णांना समाजातील सेवाभावी संस्था, दानशुर व्यक्ती यांनी पोषण आहारासाठी मदत करण्यासाठी पोषक आहाराच्या स्वरुपातच मदत करावी’असे आवाहन उपायुक्त रविकांत आडसूळ यांनी केले होते. या आवाहनास प्रतिसाद देऊन रोटरी क्लबने शहरातील दहा क्षयरुग्णांना दत्तक घेतले.
यावेळी आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा यांनी प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाची माहिती दिली. रोटरीचे डिस्ट्रीक गव्हर्नर (डी.जी) व्यंकटेश देशपांडे यांनी क्षयरोग निर्मुलनाकरीता रोटरी क्लब कायम अग्रभागी राहील याची ग्वाही दिली. कार्यक्रमास रोटरी क्लबचे धनंजय थोरात, राहुल काथरुट, डॉ.अभिजीत वज्रमुष्टी, दिपीन जाजु, प्रशांत मेहता, वैद्यकीय अधिकारी डॉ.अमरसिंह पवार उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ.रुपाली दळावी यांनी आभार मानले. समाजातील स्वयंसेवी संस्था व दानशुर व्यक्तींनी या मोहिमेस सहकार्य करण्यासाठी मिरजकर तिकटी ईगल प्राईड बिल्डींग येथील महापालिकेच्या शहर क्षयरोग नियंत्रण कार्यालय या पत्यावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.