+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule19 Oct 24 person by visibility 36 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे पक्षालाच मिळायला हवी. काँग्रेसच्या नेत्यांनी मन मोठे करुन ही जागा शिवसेना ठाकरे पक्षाला सोडायला पाहिजे.’अशी आग्रही मागणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केल्या. या मेळाव्यात बोलताना उपनेते संजय पवार यांनी, ‘हा मतदारसंघ कोणाकडे यासंबंधी अद्याप निर्णय झाला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो आदेश देतील तो अंतिम असेल.’असे स्पष्ट केले.
शहरप्रमुख सुनील मोदी यांनी कोल्हापूर उत्तर ही जागा शिवसेनेला मिळायला हवी असे सांगितले. शशी बीडकर, विशाल देवकुळे, रणजित आयरेकर यांनी शिवसेनेलाच हा मतदारसंघ मिळायला हवा. मातोश्रीचे आदेश आहेत म्हणून आम्ही काम करत आहे. अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. दीपक गौड, माजी नगरसेवक नियाज खान यांनीही मनोगत व्यक्त केले. सहसंपर्कप्रमुख विजय देवणे म्हणाले, ‘काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी हा मतदारसंघ काँग्रेसला मिळायला हवा हा हट्ट सोडावा. शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला उमेदवारी मिळू दे, आम्ही त्यांचा प्रचार करू.’ शहरप्रमुख रविकिरण इंगवले हे मेळाव्याला उपस्थित नव्हते. त्यांचे मनोगत सागर साळोखे यांनी वाचून दाखविले. इंगवले यांनी ही कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ शिवसेनेकडेच पाहिजे अशी भूमिका मांडली आहे.