कोल्हापूर भूषण उद्योगपती आर एम मोहिते यांचे निधन
schedule19 Dec 24 person by visibility 69 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : स्वकष्टावर उद्योग क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करत कोल्हापूर भूषण ठरलेले प्रसिद्ध उद्योगपती रामचंद्र मारुती उर्फ आर. एम. मोहिते यांचे गुरुवारी (१९ डिसेंबर २०२४ ) निधन झाले. मृत्यूसमयी ते ९२ वर्षाचे होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती. शुक्रवारी, २० डिसेंबर रोजी पंचगंगा स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मोहिते उद्योग समूहाचे दिलीप मोहिते व शिवाजी मोहिते यांचे ते वडील होतं.
आर एम मोहिते हे अण्णा या नावांनी सर्वपरिचित होते. त्यांनी बांधकाम व्यवसयात नावलौकिक मिळवला होता. महाराष्ट्रातील अनेक धरणाच्या बांधकामात त्यांचे योगदान आहे. त्यांनी तरुण उद्योजकांना नेहमी प्रोत्साहन दिले. बांधकाम व्यवसायासह टेक्सटाईल मिल्स उभारणी करुन त्यांनी उद्योग जगतात वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून कोल्हापूर महापालिकेने त्यांना कोल्हापूर भूषण पुरस्कारांनी सन्मानित केले होते. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले होते. येथील डॉ. डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाकडून २०२२-२३ या वर्षाचा “ डॉ. डी. वाय पाटील जीवनगौरव पुरस्कार’’ त्यांना प्रदान करण्यात आला होता.