मिरजकर तिकटी परिसरात खासबाग सांस्कृतिक संकुल, दहा कोटीचा निधी -राजेश क्षीरसागर
schedule08 Feb 25 person by visibility 267 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरची कला, क्रीडा, कुस्ती आणि सांस्कृतिक ठेवा जपला जावा यासाठी मिरजकर तिकटी या ठिकाणी खासबाग सांस्कृतिक संकुल साकारले जाणार आहे. यासाठी दहा कोटी निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. .
"स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” साठीच्या एकछत्र योजनेंतर्गत कोल्हापूर येथे खासबाग सांस्कृतिक संकुल उभारण्यात येणार आहे. खासबाग कुस्ती मैदानाला साजेसे अशी वास्तू असेल. या वास्तूमध्ये कोल्हापूरच्या कुस्तीचा संपूर्ण इतिहास चित्र आणि शिल्पाच्या माध्यमातून उभारला जाईल. यासाठी विशेष दालन असेल. त्याचबरोबर कोल्हापूरची कलाक्षेत्रासाठी विशेष दालन असणार आहे.
खासबाग मैदानाला अधिक महत्त्व निर्माण होणार आहे. रंकाळ्याबरोबरच कोल्हापूरकरांसाठी खासबाग सांस्कृतिक संकुल हे महत्त्वाचं स्थान निर्माण करेल. सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्याकडून "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत होत असलेल्या खासबाग सांस्कृतिक संकुल च्या माध्यमातून कोल्हापूरची कुस्ती आणि सांस्कृतिक ठेवा जपला जाणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या पर्यटकांसाठी ही वास्तू आकर्षण ठरेल, असा विश्वासही आमदार क्षीरसागर यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रति,
मा.संपादकसो,
दैनिक/वृत्तवाहिनी/वेबपोर्टल,
वरील बातमी आपल्या लोकप्रिय प्रसिद्धी माध्यमाद्वारे प्रसिद्ध करून सहकार्य करावे, ही विनंती.
आपला,
नंदू सुतार,
स्वीय्य सहाय्यक,
तथा कार्यालय प्रमुख, शिवालय, शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय, शनिवार पेठ, कोल्हापूर