+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustमोदी सरकारने दहा वर्षातील जनहिताची नऊ कामे सांगावीत-सुषमा अंधारे adjustजिकडे भेळ तिकडे खेळ अशी मंडलिक-महाडिकांची निती : सुषमा अंधारेंचा हल्लाबोल adjust मयत सभासद योजना कुटुंबियांसाठी ठरली अमृत संजीवनी- सभासदांच्या वारसदारांच्या भावना adjustअमृत संजीवनी योजना वादाच्या भोवऱ्यात, जिल्हा उपनिबंधकांनी मागविला अहवाल adjustशहीद पब्लिक स्कूल तिटवेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात adjustकेआयटीतर्फे नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा adjust राजू मगदूम प्रचारापासून अलिप्त ! महायुतीत रुसवे -फुगवे कायम !! adjustडॉ. संजय डी. पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार adjustएमआयएमकडे पाठिंबा मागितलेला नाही, स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही-महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण adjustमोदींच्या सभेला दोन लाखावर लोक जमतील- हसन मुश्रीफ
Screenshot_20240226_195247~2
schedule05 Dec 22 person by visibility 254 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी हकोल्हापूर : 
राजर्षी शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर अतिशय दिमाखदार झालेल्या सोहळ्यात वेस्टर्न फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे आणि विफा महिला अध्यक्ष मधुरिमाराजे यांच्या हस्ते  शाहू छत्रपती के एस ए फुटबॉल स्पर्धेच्या लोगोचे अनावरण झाले.
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त नवीन लोगोचे अनावरण करण्यात आले आहे. वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेमध्ये १६ संघ असून ही स्पर्धा दुसऱ्यांदा पुढे ढकललेली आहे. २२ डिसेंबर खेळली जाणार आहे. राज्यस्तरीय स्पर्धा आणि आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी वरिष्ठ संघातील खेळाडू सहभागी होणार असल्याने संघाने स्पर्धा पुढे घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.
सोहळ्यास के. एस. ए. चे सचिव माणिक मंडलिक, सदस्य संग्राम सिंह यादव, निलराजे पंडित, राजेंद्र दळवी, विश्वास कांबळे, नंदकुमार बामणे, नितीन जाधव, संजय पोरे, प्रदीप साळोखे, अमर सासने, भाऊ घोडके शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण आदी उपस्थित होते.