केआयटीत मयुरा एआयसीटीई आयडिया लॅब उद्घाटनासह आंतरराष्ट्रीय परिषद
schedule29 Mar 23 person by visibility 995 categoryशैक्षणिक
३,४,५ एप्रिलला गिस्फी सभा व आतंरराष्ट्रीय परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय कोल्हापूर येथे सोमवारी (३ एप्रिल) उद्घाटन होणार आहे. तसेच ३,४ व ५ एप्रिल २०२३ रोजी ४० व्या ग्लोबल आयसीटी स्टॅण्डर्डायझेशन फोरम फॉर इंडियाची सभा होणार आहे. त्यासोबतच '6 जी व वायरलेस नेटवर्क टेक्नॉलॉजीस' या विषयावरील आतंरराष्ट्रीय परिषद होणार असून त्यासाठी जगभरातील संशोधक यामध्ये भाग घेणार आहेत अशी माहिती केआययटीचे कार्यकारी संचालक डाॅ.व्ही.व्ही.कार्जिन्नी, संचालक डाॅ.मोहन वनरोट्टी व अधिष्ठाता, संशोधन व विकास डाॅ.शिवलिंग पिसे, डॉ. महेश चव्हाण, डॉ. नितीन सांबरे, प्रा. प्रमोद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (एआयसीटीई) ने मंजूर केलेल्या मयुरा एआयसीटीई आयडिया लॅबचे प्रो. अनिल सहस्त्रबुध्दे, चेअरमन, नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम, चेअरमन एनबीए यांच्या हस्ते व प्रो. रामजीप्रसाद, प्रो. एमिरिटस्, अरॉस विद्यापीठ डेन्मार्क व श्री. चंद्रशेखर डोली, चेअरमन मयुरा स्टील्स प्रा. लि यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होईल.केआयटी येथील लॅब मध्ये साधारणता एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांची मशिनरी व उपकरणे विद्यार्थी तसेच परिसरातील उद्योगक्षेत्रासाठी उपलब्ध केली आहेत.
मयुरा एआयसीटीई आयडिया लॅब ही सर्वांसाठी आठवडयाचे सातही दिवस उपलब्ध असणार आहे. या लॅबमध्ये 3 डी प्रीटींग, 3 डी स्कॅनिंग, लेजर कटींग, सीएन्सी राउटर, पीसीबी मिलींग मशिन व लागणारे पूरक उपकरणे उपलब्ध आहेत. या लॅबच्या उभारणी करीता परिसरातील उद्योगजगताचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. मयुरा एआयसीटीई आयडिया लॅबच्या उभारणीसाठी ३१ उद्योगांचे योगदान लाभले आहे.
तीन दिवस चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये उदघाटन, बीजभाषण, संशोधन पेपर वाचन, व कार्यशाळा अशी रूपरेषा असणार असून जगभरातील संशोधक सहभागी व मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत.
या लॅबच्या उभारणी करीता संस्थेचे अध्यक्ष सुनिल कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली व सचिव दिपक चौगुले यांनी प्रोत्साहन दिले.