+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustदादा, वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा ! आपल्या मार्गदर्शनाने जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मिळतेय प्रेरणा ! ! adjustआपली उमेदवारी फाइनल, शिवसेनेतर्फे २८ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार-राजेश क्षीरसागर adjustजीएसटी अधिकाऱ्याला २५ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले adjustउत्तम संवाद कौशल्य म्हणजे उत्तम करिअरची संधी- डॉ विश्वनाथ मगदूम adjustजिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश adjustप्रत्येक निवडणुकीत कोल्हापूर दक्षिणमध्ये मतदानाचा चढता आलेख ! नवीन २६ मतदान केंद्रे !! adjustइचलकरंजी भाजपा कार्यालयात आवाडेंचे उत्साही स्वागत ! शशिकला जोल्ले, सुरेश हाळवणकरांनी केले स्वागत !! adjustजिल्हा परिषद कर्मचारी महासंघातर्फे आढावा बैठक adjustकरवीर तालुका शिक्षक-शिक्षकेतर पतसंस्थेतर्फे सभासदांना दीपावली भेट वस्तू वाटप adjustकोल्हापूर दक्षिणची जनता माझ्यासोबत ! निवडणुकीत नक्की पाठीशी राहील !! अमल महाडिक
1001157259
1001130166
1000995296
schedule19 Oct 24 person by visibility 488 categoryराजकीय
 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे इच्छुकांच्या मुलाखतीला स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटी शनिवारी सुरुवात झाली. लातूरचे खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी मुलाखती घेतल्या. या मुलाखतीसाठी निरीक्षक म्हणून आंध्र प्रदेशचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास नाथ उपस्थित आहेत.
 पहिल्या टप्प्यामध्ये कोल्हापूर उत्तरचे आमदार जयश्री जाधव, कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील, हातकणंगले मतदारसंघाचे आमदार राजू आवळे, शिरोळ मतदारसंघासाठी  गणपतराव पाटील यांनी मुलाखती दिल्या. करवीर विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील कॅप्टन उत्तम पाटील, यांनी मुलाखती दिल्या. राधानगरी मतदारसंघातून गोकुळचे संचालक राजेंद्र मोरे, सचिन घोरपडे, जीवन पाटील यांनी मुलाखती दिल्या. 
 चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी गोपाळराव पाटील,  अप्पी पाटील, विद्याधर गुरंबे, प्रा. किसन कुराडे, सोमनाथ आरबळे यांनी मुलाखती दिल्या. कागल विधानसभा मतदारसंघासाठी सागर कोंडेकर, दिग्विजय कुराडे यांनी मुलाखती दिल्या. प्रा. किसन कुराडे यांनी चंदगड मतदारसंघासाठी तर त्यांचे पुत्र दिग्विजय कुराडे यांनी कागल मतदारसंघासाठी मुलाखती दिली आहेत. हातकणंगलेतून टी एस कांबळे यांनीही उमेदवारी मागितली.  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, राजू लाटकर, माजी नगरसेवक आर डी पाटील, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष आनंद माने, दुर्वास कदम यांनी मुलाखती दिल्या. आनंद माने यांनी सकाळीच पक्ष निरीक्षकांची हॉटेलमध्ये भेट घेऊन आपण कोल्हापूर उत्तर मधून लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले. इचलकरंजी मतदार संघासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे, राहुल खंजीरे तर माजी नगरसेवक संजय तेलनाडे यांच्यावतीने त्यांच्या पत्नी स्मिता तेलनाडे यांनी मुलाखत दिली. शाहूवाडी मतदार सघातून गोकुळचे संचालक अमरसिंह यशवंत  पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुभाष इनामदार हे इच्छुक आहेत. दोघेही आजारी असल्यामुळे मुलाखतीला उपस्थित राहिले नाहीत मात्र त्यांच्याकडून उमेदवारी मागणीचे फॉर्म सादर झाले आहेत. दरम्यान सकाळी कोल्हापूर उत्तरसाठी मुलाखत द्यायला येत असताना आमदार जयश्री जाधव यांच्या समर्थकांनी घोषणा दिल्या.